चिमुकल्यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी

देशभरात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनचाही सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही राखी बांधण्याचा कार्यक्रम दिल्लीमध्ये पार पडला.

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशभरात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनचाही सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही राखी बांधण्याचा कार्यक्रम दिल्लीमध्ये पार पडला. ५ ते ६ वर्षांच्या चिमुकल्या मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सर्व वयोगटातील भगिनींनी पंतप्रधान मोदी यांनी राखी बांधली. सोबतच त्यांना विविध प्रकारचे गिफ्ट देखील या बहिणींनी दिले. चिमुकल्या मुली, शाळकरी विद्यार्थीनी, महिला वर्ग, दिव्यांग भगिनी, वयस्कर महिला सर्व स्तरातील बहिणी या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधताना दिसत आहेत. तर मोदीदेखील हसून, आनंदाने त्यांच्याकडून राखी बांधून घेत आहेत.

आज रक्षाबंधनच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहिण कोमर मोहसिन शेख हिने दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग येथे मोदींना राखी बांधली. तसेच त्यांच्या पतीने बनवलेले पंतप्रधान मोदींचे चित्र त्यांना भेट म्हणून दिले.

हेही वाचा –

याही देशांमध्ये होतोय स्वातंत्र्य दिन साजरा

‘अब्बू को वीश नही करोगे?’; भारतीयांनी पाकिस्तानच्या उडवल्या चिंधड्या