घरदेश-विदेशPM Narendra Modi यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान; पहिल्या भारतीयाचा गौरव

PM Narendra Modi यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान; पहिल्या भारतीयाचा गौरव

Subscribe

PM नरेंद्र मोदी हे जगातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचा नेहमीच विविध देशांकडून सन्मान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर देखील त्यांचा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

नवी दिल्ली : PM नरेंद्र मोदी हे जगातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचा नेहमीच विविध देशांकडून सन्मान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर देखील त्यांचा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान केला. फ्रान्सने दिलेला हा सन्मान विविध देशांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांपैकी एक आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे मोदी हे फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेले पहिले भारतीय ठरले आहेत. (PM Narendra Modi conferred with France’s highest award)

हेही वाचा – चांद्रयान-3 मोहिमेची सूत्रे महिलेच्या ‘करी’, रितू कारीधाल आहेत तरी कोण?

- Advertisement -

ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार फ्रान्समधील लष्करी किंवा नागरीकत्वासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या अनोख्या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देखील राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबतचे ट्वीट करण्यात आलेले आहे.

 परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारत-फ्रान्स यांच्यामधील भागीदारीच्या भावनेचे हे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. फ्रान्स देशाकडून करण्यात आलेला सन्मान हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसंच त्यांनी हा पुरस्कार देण्याकरिता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले आहे.

- Advertisement -

 पंतप्रधान मोदींपूर्वी जगातील अनेक नेत्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स किंग चार्ल्स, माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनाही हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

फ्रान्सने दिलेला हा सन्मान विविध देशांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांपैकी एक आहे. याआधी मागील महिन्यात जूनमध्ये इजिप्तचा ऑर्डर ऑफ द नाईल, मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीचा कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, मे 2023 मध्ये कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, मे 2023 मध्ये पलाऊ प्रजासत्ताकाचा अबकाल पुरस्काराने मोदींना सन्मानित करण्यात आलेले आहे.

याशिवाय, 2021 मध्ये भूतानचा ड्रुक ग्याल्पो, 2020 मध्ये यूएस सरकारचा लीजन ऑफ मेरिट, 2019 मध्ये बहरीनचा किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स, 2019 मध्ये मालदीवकडून निशान इज्जुद्दीनचा विशिष्ट नियम, 2019 मध्ये रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे.

तसेच, 2019 मध्ये UAE कडून ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, 2018 मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, 2016 मध्ये अफगाणिस्तानचा गाजी अमीर अमानुल्ला खान यांचा स्टेट ऑर्डर आणि सौदी अरेबियाने 2016 मध्ये अब्दुलअजीज अल सौदचा ऑर्डर हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देवून सन्मानित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -