घरICC WC 2023विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

Subscribe

भारताने आजच्या या सामन्यात विजय मिळवावा, यासाठी त्यांना सर्व भारतीय विविध माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आज अहमदाबाद येथे सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी X या सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC ODI WORLD CUP 2023) अंतिम सामना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यात आज (ता. 19 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि ऑस्ट्रेलियाने एकतर्फी सामना जिंकला होता. परंतु यावेळी भारतीय संघाला 20 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ आतापर्यंत सर्व 10 सामने जिंकून अपराजित राहीला असून अंतिम फेरीतही भारतीय संघच विजयी होणार असल्याचा विश्वास सर्वच क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात आला आहे. (PM Narendra Modi congratulated the Indian team for the final match of the World Cup)

हेही वाचा – ICC Cricket World Cup 2023 : सोनिया गांधी यांनी अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

भारताने आजच्या या सामन्यात विजय मिळवावा, यासाठी त्यांना सर्व भारतीय विविध माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यासाठी देशातील कानाकोपऱ्यात होमहवन, पूजा-अर्चा सुरू आहेत. पुण्यात तर कर्णधार रोहित शर्मा याच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आज अहमदाबाद येथे सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी X या सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ऑल द बेस्ट टीम इंडीया, 140 कोटी भारतीय तुमच्यासाठी चिअर करतायत, त्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे. अजून चमकार खेळ दाखवा. चांगले खेळा आणि खेळाडूवृत्तीचे स्पिरिट कायम ठेवा.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघातून प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे खेळणार आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितच्या या शिलेदारांना आता कांगारूच्या संघासमोर धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करण्यासाठी धावांचा डोंगर आणि सोबतच भारतीय गोलंदाजांचा आक्रमक हल्ला महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -