घरदेश-विदेशQuad summit: पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

Quad summit: पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

Subscribe

पंतप्रधान मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. नुकतेच मोदी विमानतळावर दाखल झाले आहेत. अमेरिकेतील सत्ता बदलानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिली अमेरिका भेट आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची भेट घेणार आहेत. मोदी आणि बायडेन यांच्यात २४ सप्टेंबरला द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत- अमेरिकेतील संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी ५ दिवसांच्या म्हणजेच २२ ते २७ असा अमेरिका दौरा आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक परदेशी दौरे रद्द झाले होते. त्य़ामुळे अनेक महिन्यांच्या कालावधीनंतरचा पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौरा महत्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यावर मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्रांची महासभा म्हणजेच युएनजीएच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातील नेत्यांसोबत बैठक करणार आहे.

- Advertisement -

या बैठकीसाठी जगभरातील जवळपास १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेत येणार आहेत. यात पंतप्रधान मोदींबरोबरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचाही समावेश आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानच्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील.

२३ सप्टेंबर रोजी मोदी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत. तर २५ सप्टेंबरच्या एका चर्चासत्रादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधितही करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण आधीच दिले आहे. या बैठकीत अफगाणिसातान आणि सीमा भागातील अन्य मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह सीमापार दहशताद आणि कट्टरता वाद यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा होऊ शकते. पुढील बुधवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इतर देशांच्या नेत्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक ऑनलाईन बैठक घेणार आहेत. युएनजीसीच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार आहे.


पंतप्रधान मोदींचा पाच दिवसीय अमेरिका दौरा आजपासून, बायडन भेटीसह अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -