Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशPM Modi: माजी पंतप्रधान नेहरूंनी भारतीयांना 'आळशी' म्हटले होते का? वाचा- ...

PM Modi: माजी पंतप्रधान नेहरूंनी भारतीयांना ‘आळशी’ म्हटले होते का? वाचा- 65 वर्षांपूर्वीचं ‘ते’ भाषण

Subscribe

माजी पंतप्रधान नेहरूंनी खरोखरच भारतीयांना 'आळशी' म्हटले होते का? वाचा- ते 65 वर्षांपूर्वीचं भाषण

नवी दिल्ली: राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या कॅन्सल कल्चर (Cancel Culture) या नितीचाही समाचार घेतला आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप केले. (PM Narendra Modi Did former PM Jawaharlal Nehru really call Indian s lazy Read that speech 65 years ago)

1959 मध्ये लाल किल्ल्यावरून नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान या देशातील लोकांना आळशी आणि बुद्धीमत्ता कमी आहे असं समजत होते.

- Advertisement -

मोदी म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू 1959 मध्ये लाल किल्ल्यावरून काय म्हणाले होते, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. नेहरू म्हणाले होते की, भारतात साधारणपणे कष्ट करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोक जेवढे काम करतात तेवढे काम आम्ही केले नाही. असे समजू नका की हे लोक जादूने सुखी झाले आहेत, ते कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेने आज आनंदी झाले आहेत. मोदी पुढे म्हणाले की, याचा अर्थ नेहरूजींना वाटत होते की, भारतीय आळशी आहेत आणि युरोपियन लोकांपेक्षा कमी बुद्धिमत्ता आहेत. पण नेहरू खरोखरच भारतीयांना आळशी मानत होते का? नेहरूंनी त्यांच्या 1959 च्या भाषणात काय म्हटले ते जाणून घेऊया.

1959 मध्ये लाल किल्ल्यावरून नेहरू काय म्हणाले होते?

जवाहरलाल नेहरू यांनी 1959 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून म्हटले होते की, कष्ट करण्याची सवय भारतात कमी-अधिक प्रमाणात नाही. यात आपला दोष नाही, कधी कधी अशा सवयी तयार होतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आपण युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोकांइतके कष्ट घेत नाही. हे देश जादुईपणे एका रात्रीत विकसित झाले आहेत असे नाही. कठोर परिश्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे हे देश विकसित झाले आहेत. आपणही मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करू शकतो, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण कोणत्याही जादूने पुढे जाऊ शकत नाही. कारण हे जग माणसाच्या कामावर चालते, माणसाच्या मेहनतीतूनच संपूर्ण जगासाठी संपत्ती निर्माण होते, मग शेतात शेती करणार शेतकरी असो वा कारखान्यात काम करणारा कर्मचारी असो.

- Advertisement -

मोठे अधिकारी कार्यालयात बसून व्यवस्था तयार करतात, ते संपत्ती निर्माण करत नाहीत, असे नेहरू म्हणाले होते. शेतकरी आणि कारागीर त्यांच्या कष्टातून संपत्ती निर्माण होते. त्यामुळे आपली मेहनत वाढवावी लागेल.

पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींवरही साधला निशाणा

पंतप्रधान मोदींनी सोमवारी सभागृहात केलेल्या भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला होता. इंदिरा गांधींचा विश्वास भारतीय आळशी असल्याच्या नेहरूंच्या समजुतीप्रमाणेच होता, असे ते म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंदिराजींनी सांगितले होते की, भारतीयांची सवय अशी आहे की, जेव्हा काही शुभ कार्य पूर्ण होणार असते, तेव्हा आपण आत्म-समाधानाच्या भावनेने भरून जातो आणि जेव्हा कोणतीही अडचण येते तेव्हा आपण हताश होतो. काहीवेळा असे वाटते की, जणू संपूर्ण राष्ट्राने पराभवाची भावना अंगीकारली आहे. ही इंदिराजींची भारतीय आणि आपल्या देशाबद्दलची विचारसरणी होती, असे मोदी म्हणाले होते.

मोदी म्हणाले की, आज काँग्रेसच्या लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते की, इंदिरा गांधी देशातील जनतेला समजू शकल्या नसून, त्यांनी काँग्रेसच्या लोकांना बरोबर समजून घेतले होते, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.

इंदिरा गांधी त्यांच्या भाषणात काय म्हणाल्या होत्या?

पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींच्या ज्या भाषणाचा उल्लेख केला, ते भाषण 1974 साली एका सभेत केलेलं आहे. त्यावेळी देशात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरू झाले होते आणि इंदिरा गांधी यांना देशभरातून विरोध होत होता. तेव्हा एका सभेत बोलताना त्या म्हणाल्या, “आज आपला समाज नकारात्मक मानसिकतेतून जात आहे. आपल्या समाजाला या मानसिकतेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी हिंसा आणि आंदोलनं करणे हा उपाय नाही. एकमेकांविरोधात लढूनही आपण आपले लक्ष्य साध्य करू शकत नाही. नक्कीच सरकारच्या काही जबाबदाऱ्या आहेत, पण प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडावी. काळ्या बाजारातून वस्तू खरेदी न करणे, आपली शहरे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण, दुर्दैवाने आपली कामं पूर्णत्वास जातात तेव्हा आपण आत्मसंतुष्ट असतो आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण नाऊमेद होतो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की हिंमत हारू नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे.”

(हेही वाचा Pawar Vs Kolhe : अजितदादांनी कोल्हेंना दिलेलं ‘ते’ आव्हान पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -