घरअर्थजगतआर्थिक पॅकेजचा फायदा कोणाला? काय म्हणाले, आर्थिक सल्लागार संजीव सान्याल?

आर्थिक पॅकेजचा फायदा कोणाला? काय म्हणाले, आर्थिक सल्लागार संजीव सान्याल?

Subscribe

आर्थिक पॅकेजचा फायदा कोणाला होईल यावर अर्थ मंत्रालयाचे प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सान्याल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज २०२० मध्ये देशाच्या विकासाचा प्रवास स्वावलंबी बनवण्यास नवीन गती देईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, या आर्थिक पॅकेजचा फायदा कोणाला होईल अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक पॅकेजचा लाभ मिळेल, असं अर्थ मंत्रालयाचे प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सान्याल म्हणाले.

‘आज तक’ या वृत्तसंस्थेशी बोलताना संजीव सान्याल म्हणाले की, मोठ्या पॅकेजची मागणी केली जात होती. हे आर्थिक पॅकेज जीडीपीच्या १० टक्के आहे. हे छोटे पॅकेज नाही, तर २० लाख कोटी रुपये आहे. उद्योग क्षेत्राच्या मागणीपेक्षा जास्त आहे. आमचा प्रयत्न असा आहे की समाजातील प्रत्येक घटकाला काहीतरी मिळाले पाहिजे. या पॅकेजमध्ये प्रत्येक स्तरासाठी काहीतरी असेल.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींचा संदेश म्हणजे निरर्थक निबंध – अखिलेश यादव


दोन किंवा तीन टप्प्यात माहिती दिली जाईल

अर्थ मंत्रालयाचे प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सान्याल म्हणाले की आर्थिक पॅकेजचा तपशील एकाच वेळी उघड होणार नाही. यासाठी बरेच टप्पे लागतील. विस्तृत तपशील सांगण्यास वेळ लागेल. येत्या दोन-तीन दिवसांत आर्थिक पॅकेजशी संबंधित सर्व माहिती लोकांसमोर ठेवली जाईल.

- Advertisement -

आर्थिक पॅकेज जीडीपीच्या १० टक्के

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे प्रमाण इतके मोठे आहे की अनेक देशांचे वार्षिक अर्थसंकल्प त्यामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या सुमारे दहा टक्के आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे आर्थिक पॅकेज त्यांच्यासाठी आहे जे कोरोनाच्या संकटात वाईटरित्या अडकले आहेत.

यांना मिळू शकतो फायदा

या आर्थिक पॅकेजमुळे कॉटेज उद्योग, लघुउद्योग, कामगार व शेतकरी, मध्यमवर्गीय यांना फायदा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. आर्थिक पॅकेज भारतीय उद्योगालाही नवं बळ देईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -