घरदेश-विदेशPM Modi : गोंधळ घालणाऱ्यांसाठी अधिवेशन म्हणजे पश्चात्तापाची संधी- नरेंद्र मोदी

PM Modi : गोंधळ घालणाऱ्यांसाठी अधिवेशन म्हणजे पश्चात्तापाची संधी- नरेंद्र मोदी

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवीन संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक संमंत केलं. त्यानंतर 26 जानेवारी रोजीसुद्धा आपण पाहिलं की, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारी शक्तीच्या सामर्थ्यांला, शौर्याला, नारीशक्तीच्या संकल्प शक्तीला अनुभवलं.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. संसदेच्या सभागृहात गोंधळ घालणाऱ्या खासदारांना पश्चाताप व्यक्त करण्याची ही संधी असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. (PM Narendra Modi For those who messed up convention is an opportunity to express regret Modis gang)

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवीन संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक संमंत केलं. त्यानंतर 26 जानेवारी रोजीसुद्धा आपण पाहिलं की, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारीशक्तीच्या सामर्थ्याला, शौर्याला, नारीशक्तीच्या संकल्प शक्तीला अनुभवलं. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचं आज मार्गदर्शन आणि उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे चित्र नारीशक्तीचा एक प्रकारचा उत्सव आहे. मागील दहा वर्षांत संसदेत प्रत्येकाने आपापल्या परीने काम केले. पण यावेळी मी हे आवर्जून सांगेन की, ज्यांचा मूळ स्वभावच धिंगाणा घालण्याचा आहे. त्यांचा तो स्वभाव बनला आहे. ते आधीपासूनच लोकशाहीच्या मूल्यांचं वस्त्रहरण करतात असे सगळे सर्व खासदार या अंतरिम सत्रात जेव्हा भेटतील तेव्हा ते नक्कीच आत्मपरीक्षण करतील की, गेल्या दहा वर्षांत त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या मतदार संघातील कोणत्याही शंभर व्यक्तींना जाऊन विचारावं. लोकांना ते लोक आठवणीतही नसतील, त्यांचं नावसुद्धा लोकांना आठवत नसेल अशा खासदारांनीसुद्धा संसदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

हेही वाचा : CM Eknath Shinde : आमदार बाबर यांच्या निधनावर मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक व्यक्त; आटपाडीलाही जाणार

विरोधाची धार तीव्र का असेना, निषेध तिखटही का असेना परंतु ज्यांनी संसदेत उत्तम विचारांनी आकर्षित केलं असेन त्यांची आजही अनेकजण आठवण काढतात. पुढील हजारो वर्षें त्यांचे विचार अजरामर राहतील, परंतु याउलट ज्यांनी फक्त आणि फक्त धिंगाणा घातला असेन अशांसाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे पश्चात्तापाची एक संधी आहे. तेव्हा विनंती आहे की, ही संधी जाऊ देऊ नका, देशाच्या हितासाठी तुमच्या विचारांचा लाभ सभागृहांना आणि देशालाही होईल या उमेदीने सभागृहात यावं असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

- Advertisement -

हेही वाचा : Weather Updates : उत्तरेतील हिमवृष्टीचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम; आणखी हुडहुडी वाढणार

देश विकासाच्या दिशेने

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या अंतरिम अर्थसंकल्प आपल्या सर्वांसमोर मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प पूर्ण स्वरुपाचा नाही. कारण, निवडणुकीपूर्वी आपण पूर्ण अर्थसंकल्प सादर करत नाही, त्याच परंपरेचं पालन करत उद्या अंतरिम अर्थसंकल्प मांडल्या जाणार आहे. तेव्हा मला विश्वास आहे की, देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत सतत पुढे जात आहे. सर्वांगीण विकास होत आहे. सर्वांगीण विकास म्हणजे सर्वसमावेशक विकास होय, जनतेच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरूच राहणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -