घरताज्या घडामोडीPM Modi Europe Visit: तीन देशात २५ बैठका आणि ८ जागतिक नेत्यांच्या...

PM Modi Europe Visit: तीन देशात २५ बैठका आणि ८ जागतिक नेत्यांच्या भेटी, युरोप दौऱ्यामागे पीएम मोदींचा प्लॅन काय?

Subscribe

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांसाठी युरोपच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी सर्वात आधी ते जर्मनीत पोहोचले आहेत. जर्मनीनंतर ते डेनमार्क आणि फ्रान्समध्ये जाणार आहेत. मोदींचा हा दौरा २ ते ४ मे पर्यंत असणार आहे. युरोपच्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान एकूण ६५ तासांमध्ये २५ बैठकांमध्ये त्यांचा समावेश असणार आहे. याच दरम्यान ते ८ जागतिक नेत्यांना भेटणार आहेत.

पीएम मोदींचा २०२२ चा पहिलाच विदेश दौरा आहे. या तीन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय प्रवासी आणि व्यावसायिकांचीही भेट घेणार आहेत. पीएम मोदी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये थांबणार आहेत. यानंतर ते फ्रान्सला जाऊन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

मोदींचा युरोप दौरा हा खूप खास आहे. कारण युरोपातील बहुतांश देश युक्रेनविरूद्धच्या युद्धात रशियाला विरोध करत आहेत. या देशांनी रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. दुसरीकडे, भारताने आतापर्यंत तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. मात्र, भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांना चर्चेतून सोडवण्याची विनंती नक्कीच केली आहे.

तीन देशांच्या दौऱ्याचा अजेंडा काय?

विदेश दौऱ्यावर मोदी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

जर्मनी – राजधानी बर्लिनमध्ये जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मोदी आणि स्कोल्झ ६ व्या भारत-जर्मनी आंतर आणि सरकारी सल्लामसलतचे अध्यक्षस्थान करतील. स्कोल्झ डिसेंबर २०२१ मध्ये जर्मनीचे चान्सलर बनले. नवीन सरकारच्या स्थापनेनंतरची ही पहिली आयजीसी असेल. तसेच मोदी आणि स्कॉल्झ एका व्यावसायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

डेन्मार्क – जर्मनीनंतर मोदी डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजधानी कोपनहेगनमध्ये डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडिक्सन आणि राणी मार्गरेथे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मोदी दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच भारत-डेन्मार्क बिझनेस फोरम येथील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. २०१८ मध्ये स्कॉटहोम येथे पहिली भारत-नॉर्डिक शिखर परिषद झाली.

फ्रान्स – मोदी जर्मनी आणि डेन्मार्कनंतर फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना यंदा ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत.

तब्बल सहा महिन्यानंतर पीएम मोदी विदेश दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या वर्षी २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मोदींनी इटली आणि युक्रेनचा शेवटचा दौरा केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांचा हा चौथा विदेशी दौरा असणार आहे. २०२१मध्ये मोदी तीन वेळी विदेश दौऱ्यावर गेले होते. तसेच त्यांनी २०२० मध्ये कोणत्याही प्रकारचा विदेश दौरा केला नव्हता.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, खासदार संजय राऊतांचा टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -