घरदेश-विदेशएकाचवेळी ७१ हजार तरुणांना सरकारी नोकरी, पंतप्रधान मोदींनी दिले अपॉइंटमेंट लेटर

एकाचवेळी ७१ हजार तरुणांना सरकारी नोकरी, पंतप्रधान मोदींनी दिले अपॉइंटमेंट लेटर

Subscribe

केंद्र सरकारच्या रोजगार मेळावा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जवळपास ७१ हजार तरूणांना विविध पदांसाठी नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या रोजगार मेळावा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जवळपास ७१ हजार तरूणांना विविध पदांसाठी नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून तरुणांना नोकरीच्या नियुक्तीपत्रांचे वितरण केले.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी मध्य रेल्वेच्या वतीने आयोजित आजच्या या चौथ्या रोजगार मेळ्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एकूण 2532 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यापैकी एकूण 650 जणांना प्रत्यक्ष तर 1862 जणांना ईमेल च्या माध्यमातून नियुक्ती पत्रे देण्यात आली.दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड इथे आयोजित रोजगार मेळ्यात एकूण 370 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

- Advertisement -

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आज झालेल्या कार्यक्रमात, केंद्रीय सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 25 उमेदवारांना आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते 175 अशी एकूण 200 नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हटलं, “आमचं सरकार विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांची प्रतिभा आणि ऊर्जा यांना योग्य संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आजचा नवा भारत आता ज्या नवीन नीती आणि रणनीतीवर चालत आहे त्यामुळे देशात नव्या संधी आणि मार्ग खुले झाले आहेत.”

- Advertisement -

हे ही वाचा: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं ‘हे’ उत्तर, वाचा सविस्तर…

दरम्यान नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात तीन वेगवेगळ्या भागांत रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये आसाम राज्यातील गुवाहाटी येथे, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे आणि नागालँड येथील दिमापूर या भागांचा समावेश आहे. जगभरात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरु असून भारतात ही स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा: 3 वर्षीय चिमुकला खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याला फरफटत नेलं…

यावेळी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महा व्यवस्थापक अलोक सिंह ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल आणि मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -