घरताज्या घडामोडीस्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाला जाग, मोदींनी सुधारली काँग्रेसची मोठी 'घोडचूक'

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाला जाग, मोदींनी सुधारली काँग्रेसची मोठी ‘घोडचूक’

Subscribe

मोदी सरकारने आता अधीच्या काँग्रेसच्या सरकारकडून झालेल्या चूका सुधारणारण्याचे ठरवले आहे. इतिहासात ज्या महानायकांचा उल्लेख जाणूनबुजून करण्यात आला नाही त्यांच्याविषयी पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात येणार असून मुलांना शिकवले जाणार आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकावरुन शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत सरकारला प्रश्न विचारला होता. पाठ्यपुस्तकात चुकिचा इतिहास सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून काय प्रयत्न करण्यात येतोय असा प्रश्न देसाई यांनी विचारला होता.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पाठ्यपुस्तकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. त्यांनी उत्तरात सांगितले की, सामाजिक शास्त्राच्या काही पुस्तकांमध्ये सुधारणा करून छपाईसाठी पाठवण्यात आले आहे. यंदाच्या म्हणजेच २०२२-२३ च्या शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तकांमध्ये सुधारित इतिहास शिकवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

पाठ्यपुस्तकात मुघलांबाबत स्तुतीसुमने

एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात मुघलांचे वर्णन महान आणि भारतातील एतिहासिक तथ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. यामुळे वाद निर्माण झाला होता. लाल किल्ला, कुतुब मीनार आणि ताज महल कोणी बांधला याबाबत पुस्तकात सांगण्यात आले परंतु वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवण्यात आली की, कुतुबुद्दीन ऐबकने कुतुबमिनार बांधण्यासाठी मेहरौलीतील 41 हिंदू-जैन मंदिरे पाडली आणि नंतर त्याच मंदिरांच्या ढिगाऱ्यावर मिनार बांधले.

इतिहासाच्या पुस्तकात मुघलांच्या शौऱ्याचा दाखला देण्यात आला आहे परंतु सोमनाथ मंदिर कोणी आणि कसे तोडले याबाबत सांगितले नाही. मथुरा आणि काशीची मंदिरे कोणी तोडली याबाबत सांगितले जात नाही.

- Advertisement -

भारतातील महापुरुषांना गायब केले

इतिहासाच्या पुस्तकात अकबराला महान दाखवण्यात आले आहे. परंतु आपले राज्य वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या महाराणा प्रताप यांचा इतिहास विस्तारित केला नाही. मुघलांच्या आत्याचारासमोर गुरु तेग बहादुर, गुरु गोविंद सिंग, आणि त्यांच्या चार साहेबजादांची गाथा इतिहासाच्या पुस्तकातून गायब करण्यात आली आहे.

वामपंथी विचारधारेच्या लोकांनी इतिहास लिहिला

इतिहासाबाबत असे अनेक प्रश्न आहेत जे तत्कालीन काँग्रेस सरकारवर उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रश्नांवर त्यांच्याकडून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. काही शिक्षणतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, काँग्रेसच्या सरकारने सनातन संस्कृती आणि देशाचे वीर इतिहासातून गायब व्हावेत म्हणून इतिहास लिहिण्याचे काम जाव्या आणि जिहादी विचारसणीच्या लोकांना दिले होते. ज्यांनी आपल्या उदाहरणांद्वारे इतिहासाच्या पुस्तकांना भरले.


हेही वाचा : ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात ‘ती’ सूट मिळणार की नाही?; रेल्वे मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -