घरताज्या घडामोडी'काँग्रेसच्या वाटेनं गेलो असतो तर ३७० कलम रद्द झालं नसतं'

‘काँग्रेसच्या वाटेनं गेलो असतो तर ३७० कलम रद्द झालं नसतं’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत निवेदन सादर करताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

गुरुवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले की, ‘जनतेनं फक्त देशातील सरकार बदलले नाही, बदलही बघितला आहे. आम्ही काँग्रेसच्या वाटेनं गेलो असतो तर देश बदलला नसता. ७० वर्षांनंतरही देशातून कलम ३७० रद्द केलं नसतं. तुमच्या वाटेवर चाललो असतो तर मुस्लिम महिलांना तिहेरी तलाक ही तलवार आजही घाबरवतं असती. याशिवाय राम जन्मभूमीवर मंदिर झालं नसतं’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

पुढे मोदी म्हणाले की, ‘एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाचे माननीय राष्ट्रपतींचे वक्तव्य आपल्या सर्वांना दिशा व प्रेरणा देईल आणि देशातील जनतेत आत्मविश्वास निर्माण करेल. यावेळी सरकार सर्व कामांची इतकी घाई का करीत आहे? तसचं सगळं कामं एकत्र का करीत आहोत? असा विरोधकांनी सूर लावला. यालाच प्रत्युत्तर म्हणून नरेंद्र मोदी यांनी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची कविता सादर केली. ‘लीक पर वे चलें, जिनके चरण दुर्बल और हारे हैं, हमें तो जो हमारी यात्रा से बने, ऐसे अनिर्मित पथ ही प्यारे हैं.’

- Advertisement -

‘लोकांनी फक्त एकच सरकार बदलेल आहे, एवढेचं नव्हे तर त्यांनाही हा बदल अपेक्षित आहे. या देशात एका नवीन इच्छेने आणि विचारांसह कार्य करण्याची अपेक्षा केल्यामुळे आम्हाला येथे काम करण्याची संधी मिळाली आहे’, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा – मध्य प्रदेश सरकारने सीएए विरोधातील ठराव केला मंजूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -