घरदेश-विदेशPM Modi : 'मला आरक्षण पसंत नाही, नोकरीत तर नाहीच!'; पंतप्रधान मोदींनी...

PM Modi : ‘मला आरक्षण पसंत नाही, नोकरीत तर नाहीच!’; पंतप्रधान मोदींनी वाचले पंडित नेहरुंचे पत्र

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला बुधवारी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. लोकसभेनंतर पुन्हा एकदा त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करत ते आरक्षणविरोधी असल्याचे म्हटले. यासाठी त्यांनी नेहरुंचे एक पत्रच सभागृहात वाचून दाखवले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय सचिवालयात किती ओबीसी सचिव आहेत, असा सवाल मागील अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यासोबतच जातीआधारीत जनगणनेची मागणी राहुल गांधींनी लावून धरली आहे. देशात ओबीसींची संख्या किती आहे, त्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळत आहे का? यासाठी जातीय जनगणना आवश्यक असल्याच मुद्दा राहुल गांधी वेळोवेळी उपस्थित करत आहेत. राहुल गांधींच्या या प्रश्नालाच एक प्रकारे मोदींनी प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान राज्यसभेतील भाषणात म्हणाले, पंडित नेहरुंनी एकदा एक पत्र लिहिले होते, हे पत्र त्यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याचा अनुवाद मी वाचून दाखवतो.

- Advertisement -

मोदी अनुवादित पत्र वाचत म्हणाले, ‘मला कोणत्याच प्रकारचे आरक्षण पसंत नाही, नोकरीतील आरक्षण तर खचितच नाही. मी या निर्णयाच्या विरोधात आहे, जो अकुशलतेला प्रोत्साहन देईल आणि दुय्यम दर्जाची भलामण करेल. हे पंडित नेहरुंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आहे.’

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की यामुळे मी म्हणतो की हे जन्मजात आरक्षण विरोधी आहेत. नेहरु म्हणत होते की जर एससी-एसटी-ओबीसी यांना नोकरीत आरक्षण मिळाले तर सरकारी कामकाजाचा स्तर घसरले. आज हे लोक जे आकडे सांगतात ना, त्याचे मूळ इथे आहे. त्या वेळी या लोकांनी निर्बंध आणले होते. जर त्यावेळी सरकारी भरती झाली असती आणि प्रमोशन द्वारे ते पुढे-पुढे गेले असते आणि आज इथे पोहोचले असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 जून 1961 ला नेहरुंनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा राज्यसभेत उल्लेख केला. या पत्रात पंडित नेहरुंनी मागास समाजाला जातीच्या आधारावर नोकरीमध्ये आरक्षणाची बाजू न घेता त्यांना चांगले शिक्षण देऊन सशक्त करण्यावर जोर दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या तीन दिवसांमध्ये पंडित नेहरु आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही भारतरत्न दिले – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेसने ओबीसींना कधीही पूर्ण आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी सामाजिक न्यायावर ज्ञानाच्या गोष्टी सांगू नये. मोदी म्हणाले, की काँग्रेसने ओबीसींना कधीही पूर्ण आरक्षण दिले नाही, सामान्य वर्गातील गरीबांना कधी आरक्षण दिले नाही. त्यासोबतच मोदी म्हणाले, की काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील भारतरत्न देण्या योग्य समजले नाही. आमच्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा सन्मान दिला. आता हे लोक आम्हाला सामाजिक न्यायाचा पाठ शिकवायला लागले आहेत. ज्यांची नेता म्हणून कोणतीही गॅरंटी नाही, ते मोदीच्या गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -