घरदेश-विदेशजगभरात भारताच्या डिजिटलकरणाचं कौतुक, मोदी म्हणाले शेतकरी, श्रमिकांमुळे...

जगभरात भारताच्या डिजिटलकरणाचं कौतुक, मोदी म्हणाले शेतकरी, श्रमिकांमुळे…

Subscribe

बँकिंग सुविधा गरीबांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी गरीब आणि बँकांमधील दरी संपवली पाहिजे. आपण शारीरिक आणि मानसिक दरी तर दूर केलीच आहे, आता बँकेचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आम्ही बँकिंग सेवांना देशातील ग्रामीण भागातही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, असं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली – भारतात बँकिग सुविधांना चालना देण्याकरता आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला  बँकिंग क्षेत्राशी जोडण्याकरता भारत सरकारने नवी योजना आणली आहे. ७५ डिजिटल बँकिंग युनिट्स असं या योजनेचं नाव असून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचं उद्घाटन केलं आहे. तसंच, भारतात होत असलेल्या भारतीय डिजिटलकरणाचं श्रेय भारतातील गरीब, श्रमिक आणि शेतकऱ्यांना दिलं आहे.

हेही वाचा – भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

- Advertisement -

जर्मनी, चीन आणि दक्षिण अफ्रिकापेक्षाही जास्त बँकेच्या शाखा भारतात उपलब्ध आहेत. डिजिटल बँकिंग युनिट्स सामान्य माणसांचं जीवन अधिक सुखकर बनवणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यात बँकिंग सेवा पुरवण्याकरता डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्यात आली आहे. या योजनेसाठी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कव्हर केले आहेत. सरकारच्या या योजनेत ११ सरकारी बँका, १२ खासगी बँका आणि एक स्मॉल फायनान्स बँक सहभागी होणार आहे. या योजनेतील व्यवहार पेपरलेस असणार आहे. तसंच, डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.

मोदी म्हणाले की, बँकिंग सुविधा गरीबांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी गरीब आणि बँकांमधील दरी संपवली पाहिजे. आपण शारीरिक आणि मानसिक दरी तर दूर केलीच आहे, आता बँकेचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आम्ही बँकिंग सेवांना देशातील ग्रामीण भागातही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Rx ऐवजी श्री हरी लिहा, औषधांची नावंही हिंदीतून लिहा; डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

भारतात होत असलेल्या डिजिटलकरणाचे जगभरात कौतुक होत आहे. भारतात होत असलेल्या डिजिटलकरणामुळे सामाजिक सुरक्षा निर्माण होत असल्याचं कौतुक जागतिक बँकेने केले आहे. तांत्रिक क्षेत्रात प्रगत असलेल्या देशांनीही भारताचं कौतुक केलंय. याचं संपूर्ण श्रेय गरीब, शेतकरी आणि श्रमिकांचं आहे. ज्यांनी भारताच्या डिजिटलकरणाला हातभार लावला आहे, असं मोदी म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -