घरट्रेंडिंगसर्वात लांब 'बोगिबील' पुलाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

सर्वात लांब ‘बोगिबील’ पुलाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Subscribe

आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडण्याचे काम 'बोगिबील' पुल करणार आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेजवळ असलेल्या इतर राज्यांमधील रहदारीलाही या पुलाचा फायदा होणार आहे.

ब्रह्मपुत्रा नदीवर हा पुल बांधण्यात आला आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडण्याचे काम  करणार आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेजवळ असलेल्या इतर राज्यांमधील रहदारीलाही या पुलाचा फायदा होणार आहे. आज या पुलावरुन तिनसुखिया-नाहरलगून इंटरसिटी एक्सप्रेस ही पहिली ट्रेन धावली. आठवड्यातून ५ दिवस ही ट्रेन धावणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गामुळे आसाममधील तिनसुखिया ते अरूणाचलमधील नाहरलगून या शहरापर्यंतचा प्रवास १० तासांहून कमी वेळेत पूर्ण होणर असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. हा पुल बांधण्यासाठी एकूण ५ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.


‘बोगिबील’ पुलाची वैशिष्ट्ये थोडक्यात :

  • देशातील सर्वात मोठा पुल (लांबी- )
  • आशियातील दुसरा सर्वात मोठा पूल तीनपदरी पुल
  • ८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप रोधण्याची क्षमता
  • १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी या पुलाचा पाया रचला
  • २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ‘बोगिबील’चे बांधकाम सुरू केले
  • तीन पदरी पुलाच्या खालून दोन रेल्वे ट्रॅकही जातात
  • या ट्रॅकवरुन १०० किलोमीटरच्या वेगाने रेल्वे धावू शकते
  • ब्रम्हपुत्रा नदीवर बांधलेला हा पूल एकूण ४२ खांबी आहे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -