घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

Subscribe

दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर 16 ते 27 फेब्रुवारी दरम्यान 'आदी महोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 200 स्टॉल्सद्वारे देशभरातील आदिवासी समुदायाचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा दाखवण्यात येणार आहे. सुमारे एक हजार आदिवासी कारागीर या महोत्सवात सहभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये ‘आदि महोत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडाही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांना यावेळी आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृती, हस्तकला, ​​पाककृती, वाणिज्य आणि पारंपारिक कला प्रदर्शित केल्या जात आहेत. आदिवासी समाजाने निर्माण केलेला श्री अन्न हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असेल. यावेळी पंतप्रधान मोदींनीही भाषण केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आदिवासी समाजाच्या विकास आणि वारशावर चर्चा केली.

आदिवासी समाजाचे हित हा माझ्यासाठी वैयक्तिक नातेसंबंध आणि भावनांचा विषय आहे : पंतप्रधान मोदी
लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आदि महोत्सव’ विकास आणि वारशाची कल्पना अधिक जिवंत करत आहे. जो समाज स्वत:ला दूर समजत होता, त्याला आता सरकार मुख्य प्रवाहात आणत त्याच्या दारात जात आहे. आदिवासी समाजाचे हित हा माझ्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधांचा आणि भावनांचा विषय आहे.

- Advertisement -

आदिवासींच्या जीवनशैलीने मला खूप काही शिकवले : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी समाज आणि कुटुंबासोबत अनेक आठवडे घालवले आहेत. मी तुमच्या परंपरा जवळून पाहिल्या आहेत, त्यांच्याकडून शिकलो आहे आणि त्या जगल्या आहेत. आदिवासी जीवनशैलीने मला देशाचा वारसा आणि परंपरांबद्दल खूप काही शिकवले आहे.

आदिवासींची जीवन परंपरा पर्यावरणासाठी फायदेशीर : पंतप्रधान मोदी
आज भारत आदिवासी परंपरेला आपला वारसा आणि जागतिक व्यासपीठावर अभिमान म्हणून सादर करतो. आज भारत जगाला सांगतो की जर तुम्हाला हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या आव्हानांवर उपाय हवा असेल तर आमच्या आदिवासींच्या जीवन परंपरेकडे पहा… तुम्हाला मार्ग सापडेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

भारतातील आदिवासी समाजाने बनवलेल्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे.
निसर्गापासून संसाधने घेऊन आपण त्याचे संवर्धन कसे करू शकतो, याची प्रेरणा आपल्याला आदिवासी समाजातून मिळते. भारतातील आदिवासी समाजाने बनवलेल्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असून ती परदेशात निर्यात केली जात आहेत. आज विविध राज्यांमध्ये 80 लाखांहून अधिक स्वयं-सहायता गट कार्यरत आहेत, ज्यामध्ये 1.25 कोटींहून अधिक सदस्य आपले आदिवासी बंधू-भगिनी आहेत आणि यासध्ये मोठ्या संख्येने आपल्या माता-भगिनी आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आदिवासी तरुणांचा भाषेचा अडथळा संपणार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आदिवासी तरुणांना भाषेच्या अडथळ्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, परंतु आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पर्यायही खुला करण्यात आला आहे. आता आमची आदिवासी मुले, आदिवासी तरुण त्यांच्याच भाषेत शिक्षण घेऊन पुढे जातील.

हेही वाचा – मंत्रालयात न येताच मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

जेव्हा देश शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देतो : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा देश शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देतो, तेव्हा प्रगतीचा मार्ग आपोआप खुला होतो. आपल्या सरकारमधील ‘वंचितांना प्राधान्य’ या मंत्राने देश विकासाच्या नव्या आयामाला स्पर्श करत आहे.

आदिवासी भागात निर्माण केल्या जात आहेत उत्तम पायाभूत सुविधा
आदिवासी भागात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. देशातील हजारो गावे जी पूर्वी डाव्या विचारसरणीने प्रभावित होती त्यांना 4G कनेक्टिव्हिटीने जोडले जात आहे. येथील तरुण आता इंटरनेट आणि इन्फ्राद्वारे मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत, असे मत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -