घरताज्या घडामोडीPM Modi आज कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टचे करणार उद्घाटन

PM Modi आज कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टचे करणार उद्घाटन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशाला समर्पित करणार आहेत. आज सकाळी कुशीनगर येथील २६९ कोटी रुपये खर्च करून ५८९ एकरच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे बौद्ध धर्माच्या अनुयायांचे प्रमुख ‘तीर्थस्थळ’ आहे. या विमानतळावर उतरणारे पहिले आंतरराष्ट्रीय विमान श्रीलंका सरकारचे असणार आहे. ज्यामध्ये उच्चस्तरीय सरकारी शिष्टमंडळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरम्यान शासकीय मेडिकल कॉलेजसह १२ इतर प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार असल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी येथे जाऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशला बुधवारी तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुपूर्द केले जाईल, हे उत्तर प्रदेशचे भाग्य आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर पश्चिम बिहारच्या विकासात हे नवीन विमानतळ मोठे योगदान देईल. यामुळे फक्त पर्यटनात भर पडणार नसून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.’

- Advertisement -

पुढे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘भगवान बुद्धांशी संबंधित सर्वात पवित्र ठिकाणं उत्तर प्रदेशात आहेत. त्यांच्याशी संबंधित संभाव्यतेचा चांगल्या प्रकारे उपयोग गेला नाही, परंतु आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत. त्यांनी बौद्ध धर्मांशी संबंधित देशांसोबत जोडण्याचे काम केले आहे.’


हेही वाचा – राहुल गांधींना अमली पदार्थांचे व्यसन, तस्करी करतात, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -