घरताज्या घडामोडीपरीक्षा ही तर एक संधी, पंतप्रधानांची विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'

परीक्षा ही तर एक संधी, पंतप्रधानांची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’

Subscribe

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परीक्षा ही शेवटची संधी नाही. उलट परीक्षा ही एकप्रकारे संधी आहे. परीक्षा ही समस्या तेव्हा असते, जेव्हा परीक्षेला आपण जीवनाच्या स्वप्नाचा अंत पाहतो. खर म्हणजेे परीक्षा जीवन घडवण्याची एक संधी आहे. या संधीला त्याच पद्धतीने पहायला हवे. आपल्यासमोर कसोटीच्या रूपात उभ्या राहणाऱ्या परीक्षेचे संधीत रूपांतर करायला हवे. या परीक्षेपासून पळायला नको, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले. देशभरात परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांनी आज संवाद साधला. या कसोटीच्या काळात स्वतःला कसायच आहे, पळायच नाही असाही विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात पालकांचा कमी होणाऱ्या सहभागाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना प्रश्नही विचारले.

पालक आता पूर्वीसारखे पाल्याच्या अभ्यासात लक्ष देत नाही, याचे कारण म्हणजे ते अनेकदा आपआपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळेच पूर्वीच्या काळी जसे आईवडील हे मुलांसोबत चर्चा करायचे हे आता दिसत नाही. सध्या पालकांची चर्चा ही मुलांच्या करिअरच्या निमित्ताने होत असते. आपल्या मुलांना किती गुण मिळतात याकडेच पालकांचे लक्ष असते. त्यामुळेच आपल्या मुलांच्या सामर्थ्याची माहिती पालकांना नसते. त्यासाठीच मुलांच्या सामर्थ्याचा शोध पालकांनी घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. मुलांचे आकलन निकालापुरते मर्यादित नसावे यासाठी पालकांनी मेहनत घ्यायला हवी. मार्कांपेक्षा अनेक गोष्टी आहे ज्या गोष्टी पालक करत नाहीत.

- Advertisement -

परीक्षेच्या बाबतीत कोणतीही भीती बाळगायची गोष्ट नाही. अनेकदा आपल्याला संपुर्ण शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत कधी परीक्षा होणार याची कल्पना असते. त्यामुळेच परीक्षेच्या कालावधीत आवश्यकतेपेक्षा अधिक विचार करण्याची गरज नाही असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा हा आपल्या आयुष्यातील अनेक टप्प्यांपैकी एक टप्पा आहे. त्यामुळेच बाहेरचा दबाव कमी घेत, तणावमुक्त जगायला शिकता आले पाहिजे असेही नरेंद्र मोदी म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -