PM Narendra Modi In Tokyo : मला लोण्यावर नाही दगडावर रेष ओढायला आवडतं, मोदींनी टोकियोत मांडली भूमिका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या जपानच्या (Japan Tour) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर इथल्या क्वाड परिषदेत सहभागी होणार आहेत. जपानमधील भारतीयांनी बोलावलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी हजेरी लावली. यावेळी मला लोण्यावर नाही तर दगडावर रेष ओढायला आवडतं, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी टोकियोत (Tokyo) आपली भूमिका मांडली आहे.

…मी दगडावर रेष ओढतो

माझ्यावर जे संस्कार झालेत ज्यांनी मला घडवलं आहे. त्यामुळं मलाही एक सवय लागली आहे. मला लोण्यावर रेष ओढायला आवडत नाही, मी दगडावर रेष ओढतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण किती ठामपणे काम करत आहोत, याची ग्वाही दिली.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) सुरुवातीच्या काळात जेव्हा सर्वकाही बंद होतं. त्या संकटाच्या काळातही केंद्र सरकार (Central Government) केवळ एक बटन दाबून करोडो भारतीयांपर्यंत मदत पोहोचवत होतं. ज्यासाठी ही मदत निश्चित करण्य्यात आली होती, त्यांनाच ती वेळेत मिळाली आणि या संकटातून मार्ग काढण्याचं सामर्थ्यही त्यांना मिळालं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पुढील २५ वर्षे स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताला आपल्याला जगात कुठे कुठे पोहोचवायचं आहे. त्या मार्गावर आज भारत चालू लागला आहे. भारतात आज खऱ्या अर्थानं जनतेचं सरकार काम करत आहे. सरकारचं हेच मॉडेल लोकशाहीवर विश्वास दृढ होण्याचं सर्वात मोठं कारण आहे.


हेही वाचा : उद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार म्हणायचं, पाणी टंचाईवरुन रावसाहेब दानवेंचा आक्रोश