घरदेश-विदेश75 हजार युवकांना रोजगाराचे नियुक्त पत्र; पंतप्रधान मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्याचा शुभारंभ

75 हजार युवकांना रोजगाराचे नियुक्त पत्र; पंतप्रधान मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्याचा शुभारंभ

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्या शुभारंभ झाला. या मोहिमेअंतर्गत येत्या 18 महिन्यात ही सर्व रिक्त पदे सरकार भरणार आहे. दरम्यन आज 75 हजार युवकांना केंद्राकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली, या रोजगार मेळाव्याच्या उद्धाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासियांना धनत्रयोदशी सणाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच आज 75 हजार युवकांना रोजगाराचे नियुक्त पत्र देत असल्याचे जाहीर केले.

 

- Advertisement -


यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरु आहे. आज त्यात आणखी एका योजनेचा समावेश होत आहे. ही योजना म्हणजे रोजगार मेळावा. केंद्र सरकार स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हजार युवकांना एका कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त पत्र देणार आहे. गेल्या आठ वर्षातही अनेक युवकांना नियुक्त पत्र दिले आहे. मात्र यावर्षीपासून आम्ही सर्वांना एकत्र नियुक्त पत्र देण्याची परंपरा सुरु केली आहे. यामुळे विविध विभागातही टाईम बाऊन्स प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी सामूहिक स्वभाव बनेल, सामूहिक प्रयत्न होईल. यामुळे भारत सरकारने अश्याप्रकाणे रोजगार मेळावा सुरु केला आहे. येणाऱ्या महिन्यांच अशाप्रकारे लाखो तरुणांना भारत सरकारद्वारे वेळोवेळी नियुक्त पत्र दिले जाईल.

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर चालत आहोत, आज केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये एवढी निकड निर्माण झाली आहे, त्यामागे सात-आठ वर्षांची मेहनत आहे, कर्मयोगींचा मोठा संकल्प आहे. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सात-आठ वर्षात आम्ही 10 नंबरवरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे शक्य होत आहे कारण गेल्या 8 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते, त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत. असंही मोदी म्हणाले.

- Advertisement -

आज आमचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील उद्योगांच्या गरजेनुसार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे.गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आणखी एक उदाहरण म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग. देशात प्रथमच खादी आणि ग्रामोद्योगने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्टार्टअप इंडिया मोहिमेने देशातील तरुणांची क्षमता संपूर्ण जगात प्रस्थापित केली आहे. 2014 पर्यंत देशात मोजकेच स्टार्टअप होते, आज ही संख्या 80 हजारांच्या पुढे गेली आहे. अशी माहिती देखीस मोदींनी दिली आहे.


ऐतिहासिक क्षण! इस्रोचं ‘बाहुबली’ रॉकेट लाँचिंगसाठी सज्ज, 36 सॅटलाइट होणार प्रक्षेपित

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -