घरCORONA UPDATEकोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यास १ लाख वॉरियर्स सज्ज, पंतप्रधानांकडून आज नव्या महाअभियानाची...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यास १ लाख वॉरियर्स सज्ज, पंतप्रधानांकडून आज नव्या महाअभियानाची घोषणा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी २६ राज्यांतील १११ प्रशिक्षण केंद्रातील कोरोना काळातील आरोग्य सेवेतील फ्रंटलाइन कामगारांसाठी एका खास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सावधगिरीने समोर येणाऱ्या आव्हांना सामोरे जाण्यासाठी देशात सुसज्जता आणखी वाढवली पाहिजे. असे सांगितले. तसेच आरोग्य सेवेतील फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा करत मोदी म्हणाले की, आज देशात कोरोना विरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवेतील फ्रंडलाईन सुमारे १ लाख वॉरियर्स तयार करण्याची मोठी मोहिम सुरु होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आपण पाहिले की, कोरोनाचे बदलते व्हेरियंट देशासमोर नवे आव्हान उभे करत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणु अद्यापही आपल्यात असून त्याचे व्हेरियंट सतत बदलण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, कोरोना साथीच्या विज्ञानाने सरकार, समाज, संस्था आणि व्यक्तीला आपल्या क्षमतांना अधिक विस्तार करण्यासाठी सावध केले आहे. सध्या देशात कोरोनाशी लढाण्यासाठी सुमारे १ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून हा प्रशिक्षण अभ्यासक्रम २ ते ३ महिन्यांत पूर्ण होईल.

- Advertisement -

आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या प्रशिक्षण मोहिमेमुळे कोरोनाशी लढाण्यासाठी आपल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा मिळेल तसेच देशातील तरुण वर्गाला रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. गेल्या ७ वर्षात नवीन एम्स, नवीन वैद्यकीय महाविद्यालये, नवीन नर्सिंग महाविद्यालये उभारण्यावर भर देण्यात आला आहे, त्यापैकी बर्‍याच संस्थांचे कामकाज सुरू झाले आहे.

- Advertisement -

आरोग्य क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, स्किल इंडियाचे प्रमाणपत्र, जेवन व राहण्याची सोय, नोकरीवरील नोकरीसह वेतन आणि प्रमाणित उमेदवारांना २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचे कौतुक

त्याचप्रमाणे खेड्यापाड्यांमध्ये, दुर्गम भागांत, आणि डोगराळ व आदिवासी भागांमध्ये लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आमच्या आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका आणि ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे असे म्हणत पंतप्रधानांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हेल्थकेअर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना डीएससी / एसएसडीएमच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, आरोग्य सुविधा व रुग्णालयात काम करू शकतील.


ड्रोनद्वारे फक्त ६०० रुपयांत पोहचणार वॅक्सिनच्या १० हजार कुप्या, कर्नाटकात ट्रायल सुरु


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -