Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ujjwala 2.0 पंतप्रधानांकडून लाँच; Address प्रूफशिवाय गॅस कनेक्शन

Ujjwala 2.0 पंतप्रधानांकडून लाँच; Address प्रूफशिवाय गॅस कनेक्शन

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा येथे उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा ( Ujjwala Yojana २.०) सुरू झाला. यादरम्यान मोदींवी या योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. आता अॅड्रस प्रूफशिवाय पण गॅस कनेक्शन मिळेल, असे मोदींनी सांगितले. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे योजनेतील लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या देहरादूनच्या बुंदी देवींशी संवाद साधला. उज्ज्वला योजनेमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले, हे बुंदी देवींनी सांगितले.

संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘उज्ज्वला योजनेने देशातील जितक्या लोकांचे, महिल्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे, हे अभूतपूर्व आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथून स्वातंत्र्य संग्रामाचे प्रणेते मंगल पांडे यांच्या भूमीपासून २०१६ मध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आली. आज उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा उत्तर प्रदेशातील महोबाच्या वीरभूमीपासून सुरू होत आहे. उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यात अनेक माता भगिंनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. मी सर्व लाभार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. आज मला बुंदेलखंडच्या आणखी एका महान व्यक्तीची आठवण येत आहे. मेजर ध्यानचंद, आमचे दादा ध्यानचंद. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे.’

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?

- Advertisement -

२०१६मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला सुरुवात झाली होती. त्यावेळेस ५ कोटी बीपीएल कुटुंबातील महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचा लक्ष्य ठेवले होते. २०१८ मध्ये दलित, आदिवासी, सर्वाधिक मागासवर्गीय महिलांसह विविध श्रेणी या योजनेच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आल्या. याच दृष्टीकोनातून ८ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले. हे लक्ष्य २०१९ मध्ये पूर्ण झाले.

- Advertisement -