घरदेश-विदेश'जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार'

‘जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार’

Subscribe

गुरुवारी गुजरातच्या राजकोटमध्ये एम्सची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

देशात कोरोना व्हायरस नियंत्रण येत असताना कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनने देशाची चिंता अधिक वाढवली आहे. दरम्यान, कोरोना लस लवकरच भारतात मंजूर होईल आणि लसीकरणाची मोठी मोहीम राबविली जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या राजकोटमध्ये एम्सची पायाभरणी केली. यावेळी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

- Advertisement -

 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. २०२० ला एका नवीन राष्ट्रीय आरोग्य सुविधेसह निरोप देणं हे आगामी प्राधान्यक्रमांचे स्पष्टीकरण देते. तर कोरोना लसी संदर्भात मोदी म्हणाले, २०२१ हे नवीन वर्ष कोरोनावरील उपचारांच्या आशेने येत आहे. यासह भारतात प्रत्येक आवश्यक ती तयारी सुरू आहे. लस प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविण्याच्या तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

- Advertisement -

पंतप्रधान म्हणाले की, यावर्षी बर्‍याच कोरोना वॉरियर्सने आपला जीव गमावला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांना नक्कीच नतमस्तक व्हावे लागेल. कोरोना महामारी दरम्यान, वर्षभर देशातील विविध भागातील लोकांनी अनेक प्रकारची सेवा केली. जेव्हा भारत एकजूटीने उतरतो, तेव्हा देश कोणत्याही कठीण संकटाला सामोरे जाऊ शकतो. योग्य वेळी भारताने चांगले निर्णय घेतले, म्हणूनच आज आपली परिस्थिती अधिक उत्तम आहे. कोरोनावर मात करण्यात भारताची कामगिरी चांगली असल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, गुजरातच्या राजकोट येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) संस्थेला २०१ एकराहून अधिक जागा देण्यात आली असून सुमारे १,१९५ कोटी रुपये खर्चून ही इमारत तयार करण्यात येणार आहे. सन २०२२ च्या मध्यापर्यंत संस्थेचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील उपस्थित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -