घरदेश-विदेशPM Narendra Modi : आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; राहुल गांधींच्या...

PM Narendra Modi : आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; राहुल गांधींच्या टीकेला मोदींचं उत्तर

Subscribe

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बुधवारी (7 फेब्रुवारी) राज्यसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : एलआयसीबाबतही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. एखाद्याला नष्ट करायचे असेल, तर खोटी माहिती पसरवली जाते. एलआयसीबाबतही अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मी तुम्हाला छातीठोकपणे सांगू इच्छितो, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहेत असं खणखणीत उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना दिलं. (PM Narendra Modi LIC shares at record high today Modis reply to Rahul Gandhis criticism)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बुधवारी (7 फेब्रुवारी) राज्यसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेतून काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार राहुल गांधी यांनी एलआयसीबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारी कंपन्यांवर नको नको ते आरोप करण्यात आले होते. मारुतीच्या स्टॉकचे काय झाले होते, हे देशाला माहित आहे. काँग्रेसकडून आरोप करण्यात आला होता की, आम्ही सरकारी कंपन्यांना बुडवले. बीएसएनएल आणि एमटीएनएल बुडवणारे कोण होते? एचएएलची दुर्दशा कशामुळे झाली? युपीएच्या काळात सरकारी कंपन्यांची ही परिस्थिती कोणी केली? आज एचएएल विक्रमी महसूल मिळवत आहे. आज एचएएल ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती कंपनी बनली आहे. आमच्या सरकारने विकासाची कामे केली.

हेही वाचा : Nagpur News : काटोलच्या शासकीय कार्यक्रमात राजकीय गोंधळ, फडणवीसांसमोर अनिल देशमुख संतापले

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी वाचला विकासाचा पाढा

राज्यसभेतून विरोधकांवर हल्ला करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. ते म्हणाले री, यूपीए सरकारमध्ये 234 पीएसयू होते, आज 254 पीएसयू आहेत, आम्ही 20 ने वाढ केली. पीएसयू विकल्याचा आरोप आमच्यावर केला, पण आम्ही यात वाढ केली.

हेही वाचा : Narendra Modi : सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला; मोदींचा आरोप

बहुतांश पीएसयू विक्रमी पातळीवर नफा देत आहेत.पीएसयूचा निव्वळ नफा 1.25 लाख रुपये होता, जो आज वाढून अडीच लाख कोटी रुपये झाला आहे. आमच्या गेल्या 10 वर्षांत पीयूसीचे नेटवर्थ 9.5 लाख कोटी रुपयांवरुन 17 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. पीएसयू बंद करण्याबाबत अफवा पसरवण्यात आल्या. मेहनत करुन आम्ही आमची देशाची प्रतिष्ठा वाढवली. सामान्य गुंतवणूकदाराचे नुकसान होईल अशा पद्धतीच्या गोष्टी पसरू नका, असे आवाहनही मोदींनी यावेळी विरोधकांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -