घरदेश-विदेशMann Ki Baat: कोरोना लसीबद्दलच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका - पंतप्रधान

Mann Ki Baat: कोरोना लसीबद्दलच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका – पंतप्रधान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात या कार्यक्रमाच्या ७६ व्या भागाद्वारे देशाला संबोधित केले. मन की बात कार्यक्रमाच्या या भागात त्यांनी कोरोना महामारीवर चर्चा केली. यावेळी त्यांनी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, फ्रंटलाईन वर्कर आणि कोरोनाविरूद्ध लढाई जिंकलेल्या लोकांशीही त्यांनी संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावरही त्यांनी भाष्य केले. या दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी आज अशावेळी तुमच्याशी संवाद साधतोय, जेव्हा कोरोना आपल्या सर्वांचे सहनशीलतेची, संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी मोदींनी असे सांगितले की, केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अफवावर विश्वास ठेवू नका

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीसंबंधित सर्व अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि सर्वांना लस घ्यावी, असे आवाहन केले. मोदी म्हणाले, कोरोना युगात लस नसल्याची जाणीव सर्वांना आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. राज्य सरकारला देखील मोफत लस देण्यात येत आहे. १ मे पासून, १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. तर केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे, जिचा लाभ ४५ वर्षांवरील सर्व व्यक्ती घेऊ शकतात. येत्या १ मे पासून देशात १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे. कोणत्याही नागरिकाने कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

दुसऱ्या लाटेने देशाची चिंता अधिक वाढवली

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणाने मात केली त्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले होते. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाची चिंता अधिक वाढवली आहे. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यासंदर्भात बैठका घेत असल्याचेही मोदींनी जनतेला यावेळी सांगितले.

- Advertisement -

तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारे कोरोनाची भीती निर्माण होऊ नये, म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये तज्ज्ञांशी संवाद साधला. तसेच त्यांना देशावासियांशी संवाद साधायला लावला. मुंबईतील लिलावती रुग्णालयाती प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी, श्रीनगरचे डॉ. नाविद यांना जनतेशी संवाद साधायला संधी दिली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा करताना लोकांच्या मनातील काही प्रश्न उपस्थित केले. डॉ. शशांक जोशी यांच्याशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘आपण कोरोनाच्या काळात दिवसरात्र काम करत आहात. त्यामुळे तुम्ही नागरिकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावे. करोनाची दुसरी लाट कशी आहे आणि कोणती काळजी घ्यायला हवी?,’ यावर उत्तर देताना शशांक जोशी म्हणाले,”पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. मात्र रिकव्हरी रेट उत्तम आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. ८० टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. ”

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -