घरदेश-विदेशकाँग्रेसचा प्रचार करणार, मोदींचा 'हमशकल'

काँग्रेसचा प्रचार करणार, मोदींचा ‘हमशकल’

Subscribe

मी भाजपवर नाराज असलो तरी पंतप्रधान मोदींविषयी माझ्या मनात आदर कायम राहील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे त्यांचे हमशकल अभिनंदन पाठक सर्वांनाच परिचयाचे आहेत. अभिनंदन पाठक आता एका नव्या मुद्द्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. हुबेहुब मोदींसारखे दिसणारे पाठक आता आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहेत. २०१४ सालच्या निवडणुकांमध्ये पाठक यांनी भारतीय जनचा पक्षाचा प्रचार केला होता. मात्र, २०१९च्या निवडणुकांसाठी ते काँग्रेसचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पाठक यांनी लखनऊमधील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वत:च ही इच्छा व्यक्त केल्याचे समजत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी याविषयी पाठक यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत भाजपकडून प्रचार करणाऱ्या आनंद पाठकांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करण्याचं का ठरवलं असेल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

‘मी मोदींचा चाहता’ पण…

उपलब्ध माहितीनुसार, एका काँग्रेस कार्यकर्त्याने पाठक यांना ‘भाजपने कबूल केलेले १५ लाख रुपये माझ्या खात्यात कधी येणार’, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पाठक म्हणाले ‘या आणि अशा काही मुद्द्यांमुळेच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत मी भाजपच्या विरोधात प्रचार करण्याचे ठरविले आहे.’ या निर्णयाविषयी स्पष्टीकरण देताना पाठक म्हणाले, ”मी पंतप्रधान मोदांचा चाहता आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. मी भाजपवर नाराज असलो तरी मोदींविषयी माझ्या मनात आदर कायम राहील”. अभिनंदन पाठक यांनी स्वत:ही १९९९ मध्ये लोकसभा तर २०१२ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आहे.


Video: भारतीय वायुदलाच्या जवानांचे थरारक प्रात्यक्षिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -