घर देश-विदेश ISRO : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट, चांद्रयान 3 लॅंड झालेल्या...

ISRO : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट, चांद्रयान 3 लॅंड झालेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव

Subscribe

23 ऑगस्टला चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26 ऑगस्ट) इस्रोच्या वैज्ञानिकांची इस्रो सेंटरमध्ये जाऊन भेट घेतली.

बंगळुरू : 23 ऑगस्टला चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26 ऑगस्ट) इस्रोच्या वैज्ञानिकांची इस्रो सेंटरमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी इस्रो सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रोच्या प्रमुखांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर चांद्रयान 3 चे नेतृत्व केलेले वैज्ञानिक या मोहीमेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांद्रयान 3 बाबतची संपूर्ण माहिती दिली. चांद्रयान 3 अवकाशात कशा पद्धतीने झोपावले आणि त्यानंतर त्याने कशा पद्धतीने चंद्रावर लँडिंग केले याबाबतची संपूर्ण माहिती त्यांना दिली. ( PM Narendra Modi meets ISRO scientists, Chandrayaan 3 land site named ‘Shiv Shakti’)

हेही वाचा – Chandrayaan-3: चांद्रयानाचं पहिलं नाव होतं…; ही अटलबिहारी वाजयपेयींची कल्पना; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

- Advertisement -

इस्रोच्या वैज्ञानिकांकडून मिळालेली माहिती जाणून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वैज्ञानिकांचे तोंडभरून कौतुक तर केलेच त्यासोबतच मोदींनी चांद्रयान 3 ज्या ठिकाणी लँड झाले त्या जागेला नाव दिले. तसेच चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये ज्यावेळी चांद्रयान 2 हे काही अंतरावर येऊन चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. त्या भागाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाव देण्यात आलेले आहे. ज्या जागेवर चांद्रयान 3 उतरले आता त्या जागेला शिवशक्ती या नावाने ओळखले जाणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँईंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपले चांद्रयान उतरले आहे, भारताने त्या जागेला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जागेवर चांद्रयान 3 चे मून लँडर उतरले आहे, त्या पाँईटला ‘शिवशक्ती’च्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शिवमध्ये मानवताच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे. असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

तर चार वर्षांपूर्वी देखील अवकाशात चांद्रयान झेपावले होते. परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर ते कोसळले. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘चांद्रयान 2’ च्या मोहीमेबाबत बोलताना म्हणाले की, आणखी एक नामकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी चांद्रयान 2 चंद्रापर्यंत पोहोचलेच होते, त्याचे पाऊल पडलेच होते की तेव्हा प्रस्ताव होता की त्या जागेचे नाव ठरवण्यात यावे, पण त्यावेळी आम्ही ठरवलं होते की जेव्हा चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचेल तेव्हा आम्ही दोन्ही पाँईंटचे नाव एकत्र ठेवू. आज मला वाटते की जेव्हा हरघर तिरंगा, हर मन तिरंगा आणि चंद्रावरही तिरंगा, तर तिरंगाशिवाय चांद्रयान 2 शी संबंधित त्या जागेला दुसरे काय नाव देता येऊ शकते? त्यामुळे चांद्रयान 2 ने जिथे आपली पावले ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे.

यावेळी पंतप्रधानांनी या मोहीमेत सहभागी झालेल्या महिला वैज्ञानिकांचे सुद्धा कौतुक केले. ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांची जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे, असे म्हणत त्यांनी महिला वैज्ञानिकांचा सन्मान केला.

- Advertisment -