घर देश-विदेश G-20 मध्ये देशाचे नाव BHARAT : प्रथमच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात INDIA नाव गायब

G-20 मध्ये देशाचे नाव BHARAT : प्रथमच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात INDIA नाव गायब

Subscribe

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत आजपासून G-20 शिखर परिषद सुरू झाली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये जेव्हा उद्घाटकीय भाषण केले. तेव्हा जे दृष्य समोर आले त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे देशाचे नाव INDIA ऐवजी BHARAT लिहिले होते.

ही पहिली वेळ आहे, जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात देशाचे नाव भारत लिहिले आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये झालेल्या G-20 शिखर परिषदेत मोदींच्या नावापुढे इंडिया लिहिलेले होते.

- Advertisement -

दिल्लीतील शिखर परिषदेत भारत लिहिलेले समोर आल्यानंतर स्मृती इराणी यांनी पंतप्रधानांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे, “उम्मीद और विश्वास का नया नाम भारत”

हेही वाचा : G-20 शिखर परिषद: प्रवेशद्वारात शंख, भिंतींवर भारतीय संस्कृतीचं दर्शन; जाणून घ्या, भारत मंडपमची दहा वैशिष्ट्य

- Advertisement -

इंडिया विरुद्ध भारत वादाचे कारण…
G-20 परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनाच्यावतीने आयोजित स्नेह भोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर President of Bharat लिहिले होते, 5 सप्टेंबरला ही पत्रिका समोर आली आणि भारत विरुद्ध इंडिया वादाला सुरुवात झाली.
याच दिवशी पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या कार्डवरदेखील Prime Minister of Bharat लिहिले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्या संबंधीचे एक कार्ड भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेअर केले होते.

विरोधकांचा सरकारवर आरोप, सरकारचा पलटवार
राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाकडून ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’चा उल्लेख झाल्यानंतर काँग्रेसने संविधानच्या उद्देशिकेचा फोटो ट्विट करत INDIA पुसून टाकणे शक्य नसल्याचा सरकारवर वार केला. भाजपने काँग्रेसने ट्विट केलेल्या फोटोत स्पेलिंग मिस्टेक असल्याची टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत, इंडिया-भारत वादावर न बोलण्याचा सल्ला त्यांच्या मंत्र्यांना दिला. तसेच G-20 परिषदेबद्दल अधिकृत व्यक्तींनीच बोलण्याचेही निर्देश पंतप्रधानांनी सर्वांना दिले.

हेही वाचा : बायडेन यांच्या खूशमस्करीसाठी अमेरिकन कंपन्यांना ₹12,43,98,97,50,000 किंमतीची कंत्राटे! ‘या’ नेत्याचा मोदींवर आरोप

- Advertisment -