Wednesday, March 26, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशFight Against Obesity : ओमर अब्दुल्ला, आनंद महिंद्रा, सुधा मूर्ती यांना पंतप्रधान मोदींनी दिले आव्हान, वाचा सविस्तर -

Fight Against Obesity : ओमर अब्दुल्ला, आनंद महिंद्रा, सुधा मूर्ती यांना पंतप्रधान मोदींनी दिले आव्हान, वाचा सविस्तर –

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बहुचर्चित 'मन की बात' या कार्यक्रमात रविवारी लठ्ठपणाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याच दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून त्यांनी स्थूलपणाविरोधात एक मोहीम सुरू केली आहे. यासाठी पंतप्रधानांनी समाजातील 10 प्रतिष्ठितांची नावे काढली आहेत.

Fight Against Obesity : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बहुचर्चित ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी लठ्ठपणाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याच दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून त्यांनी स्थूलपणाविरोधात एक मोहीम सुरू केली आहे. यासाठी पंतप्रधानांनी समाजातील 10 प्रतिष्ठितांची नावे काढली आहेत. लठ्ठपणाविरोधातील या मोहिमेला बळ मिळावे तसेच रोजच्या जेवणात तेलाचा वापर कमी व्हावा यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह 10 लोकांची निवड केली आहे. या यादीत सगळ्या क्षेत्रांमधील प्रमुख लोकांचा सहभाग आहे. (pm narendra modi nominates 10 people to help strengthen the fight against obesity and spread awareness)

यासंदर्भात एक पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर केली आहे. यात ते म्हणतात, ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणाविरोधातील ही मोहीम तसेच रोजच्या जेवणात खाद्यतेलाचा कमी वापर करण्याबाबात जागरूकता निर्माण करण्यासाठी मी काही लोकांना नामांकित करू इच्छितो. माझी त्यांना विनंती आहे की, त्या सर्वांनी अजून 10 लोकांची निवड करावी, ज्यायोगे आपली चळवळ अधिक व्यापक होईल.

हेही वाचा – Hit N Run Deaths : मुंबईतील हिट अँड रनच्या घटना वाढल्या, समोर आली धक्कादायक आकडेवारी

पंतप्रधानांनी कोणाचे केले नामांकन?

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, आजमगडचे माजी भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव, मनू भाकर, ऍथलिट मीराबाई चानू, मल्याळम चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेता मोहनलाल, इन्फोसीसचे सहसंस्थापक नंदन नीलकेणी, जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, हिंदी आणि तामिळ चित्रपट अभिनेता आर. माधवन, प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल तसेच इंफोसीसच्या संस्थापक आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नेमके काय म्हणाले?

रविवारच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, आठ व्यक्तिंमागे एक व्यक्ती सध्या लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे. तर मुलांमध्ये हा त्रास चार पटीने वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीचा हवाला देत ते म्हणाले की, 2022 मध्ये जगभरात 250 कोटी लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त होते.

हेही वाचा – IND Vs PAK : भारताने सामना जिंकताच आयआयटी बाबाही फिरले, म्हणे मला ठाम विश्वास –