घरदेश-विदेशअपमानास्पद वागणूक देऊन देखील शरद पवार काँग्रेससोबत - नरेंद्र मोदी

अपमानास्पद वागणूक देऊन देखील शरद पवार काँग्रेससोबत – नरेंद्र मोदी

Subscribe

ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत पवार पुन्हा गेले याची खंत वाटते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

वरिष्ठ नेते असूनदेखील शरद पवार यांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. मी शरद पवारांचा वैयक्तिकरीत्या आदर करतो. पवार यांनी जनतेसाठी काम केले, मात्र पवार यांची चूक एवढीच होती की, त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता. तेव्हा शरद पवार यांचा अपमान करत रातोरात त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. हे फक्त घराणेशाही असणाऱ्या पक्षात होऊ शकते. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत पवार पुन्हा गेले याची खंत वाटते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतून बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे देशासह राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील बारामती, गडचिरोली, हिंगोली, नंदुरबार याठिकाणच्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मेरा बुथ, सबसे मजबुत या उपक्रमाच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. यावेळी बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर, हवेली, खडकवासला या मतदारसंघातले पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

शरद पवारांचा ‘चान्स’ हुकला; म्हणून मनमोहन सिंग अॅक्सिडेंटल पीएम – आठवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -