Homeदेश-विदेशPM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी वाहिली अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली, म्हणाले...

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी वाहिली अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली, म्हणाले…

Subscribe

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती असून यानिमित्ताने दिल्लीतील सदैव अटल स्मारकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली.

(Atal Bihari Vajpayee Birth Anniversary 2024) नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती असून यानिमित्ताने दिल्लीतील सदैव अटल स्मारकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी सदैव अटल स्मारकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा पुष्पांजली वाहिली. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली होती. सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केल्याचे मोदींनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. (PM Narendra Modi paid tribute to Atal Bihari Vajpayee on his Birth Anniversary)

X या सोशल मीडिया साइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांची दूरदृष्टी आणि ध्येय विकसित भारताच्या संकल्पाला बळ देत राहील.” इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲपवर सुद्धा वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त लिहिलेला लेख शेअर केला असून त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, माजी पंतप्रधानांनी ज्या प्रकारे संविधानिक मूल्ये जपत देशाला नवी दिशा आणि गती दिली, त्याचा प्रभाव नेहमीच ‘अटळ’ राहील. ‘. त्यांचा सहवास आणि आशीर्वाद मला मिळाले हे माझे भाग्य आहे, असे त्यांच्याकडून या पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… SS UBT Vs Mahayuti : दोन्ही खून सरकार पुरस्कृत असल्याने…, ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र

मदन मोहन मालवीय यांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक पंडित मदन मोहन मालवीय यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. X या सोशल मीडिया साइटवर त्यांनी याबाबत पोस्ट करत म्हटले आहे की, “महामानव पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सक्रिय स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच ते आयुष्यभर भारतात शिक्षणाचे अग्रेसर राहिले. देशासाठी त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.”


Edited By Poonam Khadtale