घरताज्या घडामोडीकाय सांगताय? आता लसीकरणच्या प्रमाणपत्रावरही मोदी

काय सांगताय? आता लसीकरणच्या प्रमाणपत्रावरही मोदी

Subscribe

कोरोना लसीकरणच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो.

अहमदाबाद येथील ‘मोटेरा स्टेडिअम’चे सरदार पटेल क्रिकेट स्टेडिअम, असे नाव देण्यात येणार असल्याचे बोले जात होते. मात्र, त्या स्टेडिअेमला सरदार पटेल नाव न देता नरेंद्र मोदी स्टेडिअम हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे नामांतरावरुन वाद चांगलाच चिघळला असताना आता पुन्हा एकदा नवा वाद समोर आला आहे. हा वाद नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घेतल्यावर दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

- Advertisement -

काय आहे हा प्रकार?

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे दुसरी लस दिल्यावर भ्रमणध्वनीवर एक संदेश येतो. त्या संदेशावरील लिंकवर क्लिक केल्यास त्या प्रमाणपत्रावर माहिती समोर येते. त्यामध्ये लाभार्थ्यांचे नाव, लिंग, ओळख क्रमांक, लसीकरणाची तारीख आणि कोणती लस दिली याबाबत सर्व माहिती त्या प्रमाणपत्रावर येते. तर त्या प्रमाणपत्राच्या खालील बाजूस ‘दवाई भी और कडाई भी’, या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, गोवरसह इतर लसी आल्या आहेत. मात्र, त्यावर कोणत्याही नेत्यांचा फोटो नव्हता. पण, नरेंद्र मोदी यांचा कोरोनाच्या प्रमाणपत्रावर फोटो असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

‘लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी एखादा संदेश ठीक आहे. पण, पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्याची नवीन प्रथा चुकीची आहे. त्यामुळे हा फोटो तात्काळ काढून टाकावा’, अशी मागणी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19: महाराष्ट्राबाहेर जायचं प्लान आहे! ‘या’ ११ राज्यात No Entry


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -