पंतप्रधान मोदींची लोकप्रियता परदेशातही; ‘या’ बड्या नेत्यांना टाकलं मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर, परदेशातही पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे.

happy new year 2023 pm narendra modi president draupadi murmu congress mp rahul gandhi congratulated on the new year welcome 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर, परदेशातही पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणातून पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेची माहिती देण्यात आली आहे. (PM Narendra Modi popularity continues beating leaders Joe Biden Rishi Sunak)

मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 78 टक्के रेटिंग्स मिळाले आहे. हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानचे आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची अप्रुव्हल रेटिंग 68 टक्के आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदी अल्बानीज आहेत. ज्यांचे रेटिंग 58 टक्के आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनीचे रेटिंग 52 टक्के आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत 50 टक्के रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नाव येते. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे.

त्याशिवाय, भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या यादीत 11व्या स्थानावर आहेत. त्याचे रेटिंग 29 टक्के आहे.


हेही वाचा – ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’, अपघातानंतर दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने ट्विटरवर केला संताप व्यक्त