घरदेश-विदेशkerala election 2021: चांदीसाठी जूडसने येशूचा विश्वासघात केला तसाच घात LDF ने...

kerala election 2021: चांदीसाठी जूडसने येशूचा विश्वासघात केला तसाच घात LDF ने केरळचा केला – मोदी

Subscribe

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून लवकरच या निवडणुकांचा निकाल देखील जाहीर होणार आहे. मात्र यावेळी सर्वच पक्षांनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या पलक्कड येथे निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मेट्रो मॅन ई. श्रीधरन देखील उपस्थित होते. दरम्यान, निवडणुकीतील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कॉंग्रेस आणि LDF मध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे, फक्त निवडणुकीत दाखवण्यासाठी एकमेकांवर हल्ले करत असतात. ‘UDF ने सुर्याच्या किरणांदेखील सोडले नाही. तर एलडीएफबद्दल असे म्हटले जाऊ शकते, जूडसने काही चांदीच्या तुकड्यांसाठी भगवान येशूची फसवणूक करून त्याचा विश्वासघात केला, त्याप्रमाणेच एलडीएफने देखील केरळला सोन्याच्या काही तुकड्यांवरून फसवले आणि त्याचा विश्वासघात केला’

- Advertisement -

असे सांगितले जाते की, जूडसबद्दल एक कहाणी प्रचलित आहे. ज्यामध्ये असे म्हटले की, जूडसने काही अधिकाऱ्यांकडून चांदीची नाणी घेतली आणि त्याला थेट येशूला भेट दिली. जेव्हा येशू मरण पावला तेव्हा जूडसला त्याच्या कृत्याबद्दल पश्चताप आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना असेही सांगितले की, पलक्कडचे भाजपाशी असणारे नाते खूप जुने आहे. आज मी भाजपाच्या ध्येयाला तुमच्यासमोर सादर करण्यास आलो आहे. मात्र आज केरळचं राजकारण बदलत आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणारे तरूण LDF-UDF च्या राजकीय खेळीने हैराण झाले असल्याचेही यावेळी मोदींनी म्हटलं आहे.

- Advertisement -

‘LDF-UDF मध्ये मॅच फिक्सिंग आहे, मॅच फिक्सिंग असल्याने एकदा त्यांनी पाच वर्षे लुटली तर इतरांनी पुढील पाच वर्षे लुटली. कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकसारखेच आहेत. फक्त निवडणुकीच्या वेळी ते वेगळे दोघी पक्ष वेगवेगळे होतात’, असे म्हणत मोदींनी LDF-UDF यावर निशाणा साधला. देशाच्या राजकारणाला भ्रष्टाचार, जातीचे राजकारण, गुन्हेगारी, वंशवाद या कारणांमुळे खराब केले आहे. केरळमध्ये UDF आणि LDF दोघेही या कारणांना पाठीशी घालतात आणि व्होटबँकेचं राजकारण करता, असे म्हणत मोदींनी पुन्हा हल्लाबोल केला.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -