घरताज्या घडामोडीपुलवामाचा हल्ला न विसरता येण्यासारखाच - पंतप्रधान

पुलवामाचा हल्ला न विसरता येण्यासारखाच – पंतप्रधान

Subscribe

पुलवामाचा हल्ला हा कोणीच विसरू शकत नाही. ज्या शहीदांनी यासाठी प्राण गमावले त्यांना पंतप्रधानांनी मानवंदना देत सांगितले की, आपल्याला आपल्या सैन्य दलावर गर्व असायला हवा. सैन्य दलाचे धैर्य हेच येणाऱ्या पिढ्यांसाठी स्फुर्ती देणारे असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रविवारी तामिळनाडू आणि केरळ दौऱ्यावर आहेत. याठिकाणच्या विकास प्रकल्पाच्या शुभारंभासाठी पंतप्रधान आज दक्षणि भारताच्या दौऱ्यावर आहेत. आत्मनिर्भर भारताचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले गेले. मला तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचे विक्रमी स्वरूपातील धान्य उप्तादनासाठी कौतुक करायचे आहे. तर चेन्नई ही स्फुर्ती आणि नाविण्यपूर्ण संकल्पना राबवणारे शहर असल्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज चेन्नईत काही विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान उपस्थित आहेत. हे विकास प्रकल्प म्हणजे नाविण्यपूर्णतेचे आणि प्रगतीचे द्योतक आहे. या प्रकल्पामुळे समाजातील सर्व स्थरातील लोकांचा फायदाच होईल असेही पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधानांनी आज आयआयटी मद्रास येथे डिस्कव्हरी कॅम्पच्या उभारणीसाठी कोनशिलेचा शुभारंभ केला. चेन्नई नजीकच्या थायुर येथे पहिल्या टप्प्यात एकुण १ हजार कोटी रूपये गुंतवणुक करून २ लाख चौरस फुटाचे कॅम्पस तयार करण्यात येणार आहे. तर आणखी एक पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत चेन्नई मेट्रो रेल टप्पा १ च्या एक्सटेंन्शनमध्ये ३ हजार ७७० कोटी रूपये खर्च करून चैन्नई शहराची जोड ही एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनसोबत करण्यात येणार आहे. आजच्या पंतप्रधानांच्या दौऱ्या चेन्नई बीच ते अट्टीपट्टू दरम्यानच्या रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. एकुण २२.१ किलोमीटरचा हा टप्पा असून त्यासाठी २९३.४० कोटी रूपयांची गुंतवणुक या प्रकल्पाअंतर्गत करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर कोरोनासारखे संकट असतानाही आपण हा रेल्वेमार्ग सुरू करू शकलो यासाठी पंतप्रधानांनी ही आत्मनिर्मभर भारतासाठीची बुस्ट असल्याचे म्हटले. तर चेन्नई मेट्रो वेगाने वाढत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. चांगले दळणवळण हे नेहमीच वाणिज्यासाठी उपयोगी ठरते असे पंतप्रधान म्हणाले. धान्य उत्पादनामध्ये तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी नवा उच्चांक गाठल्यासाठी पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांचे कौतुक केले. उपलब्ध जल स्त्रोतांच्या पुरेपूर वापर केल्यासाठीही पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. जलसंवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांनी per drop, more crop हा कानमंत्रही शेतकऱ्यांना यावेळी दिला.

डीआरडीओने तयार केलेला अर्जुन मेन बॅटल टॅंक ( MK-1A) हस्तांतरीत करताना मला गर्व होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हा टॅंक तामिळनाडूत तयार होत असून देशाच्या उत्तरेकडील भागात देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी याची उपयुक्तता असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. सर्व जगाचे लक्ष सध्या भारताकडे आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीयांची मेहनत. तामिळनाडू हे ऑटोमोबाईल निर्मितीत ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरींग हब म्हणून परिचयाचे आहेच, पण यापुढच्या काळात तामिळनाडू हे टॅंक मॅन्युफॅक्चरींग हब म्हणून ओळखले जावे असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -