घरताज्या घडामोडीParliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत विरोधकांना देणार उत्तर, राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद...

Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत विरोधकांना देणार उत्तर, राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलणार

Subscribe

देशातील वाढती महागाई, बेरोजगारीवरुन केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. आता केंद्र सरकार चर्चेचे मार्ग बंद करुन सम्राटप्रमाणे देश चालवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावरील प्रश्नांचे उत्तर देणार आहेत. विरोधकांनी अभिभाषणावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रत्युत्तर देणार आहे. पंतप्रधान संध्याकाळी लोकसभेत बोलण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी 10 वाजता सुरु होते तर लोकसभेचे कामकाज दुपारनंतर सुरु होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केलेत या सर्व प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या कामकाजाबाबत केंद्रीय समितीने संसदीय अर्थसंकल्प अधिवेशन दोन सत्रांत घेण्याची मागणी केली होती. यामुळे पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत कामकाज चालेल तर दुसरा टप्पा 14 मार्चपासून ते 8 एप्रिलपर्यंत असणार आहे. दोन सत्रांमध्ये 1 महिन्याचे अंतर असेल. पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत अभिभाषण दिले यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर करण्यात आला यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत विरोधकांना उत्तर देण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना केंद्र सरकारवर अनेक आरोप केले आहेत. केंद्राच्या भांडवलशाही धोरणामुळे आज श्रीमंत आणि गरीब असे दोन भारत देश दिसत आहेत. असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच देशातील वाढती महागाई, बेरोजगारीवरुन केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. आता केंद्र सरकार चर्चेचे मार्ग बंद करुन सम्राटप्रमाणे देश चालवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

- Advertisement -

राज्यसभेत 100 टक्के कामकाज

राज्यसभेत 3 दिवसांपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. भाजप खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचे आणि योजनाचें कौतुक करत आहेत. तर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागण्यात येत आहे. योजनांवर आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत 100 टक्के कामकाज झाले आहे. राज्यसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात 15 तास 17 मिनिटांचा कामकाजाचा कालावधी पूर्णत: वापरण्यात आला आणि 100 टक्के कामकाज झाले.


हेही वाचा : Lata Mangeshkar Letter to PM : लतादीदींनी मोदींना गुजरातीत लिहिले होते पत्र, अन् माफीही मागितली

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -