घरदेश-विदेशPM Narendra Modi : चुन चुनके साफ कर दो..., पंतप्रधान मोदींचा राहुल...

PM Narendra Modi : चुन चुनके साफ कर दो…, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

Subscribe

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता पंतप्रधान मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यासाठी आता प्रचाराला देखील जोरदार सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते देखील प्रचाराच्या मैदानात उतरले असून दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता पंतप्रधान मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (PM Narendra Modi response to Rahul Gandhi criticism)

हेही वाचा… Congress : अशी नरमाईची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांना शोभत नाही, चीनप्रकरणी काँग्रेस आक्रमक

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांमधील शाही कुटुंबातील राजकुमार म्हणतात की, भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यानंतर देशभरात आगडोंब पसरेल. ते स्वतः 60 वर्ष सत्तेत होते. मात्र फक्त 10 वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर त्यांना देशात आगडोंब पसरण्याइतपत भाषा वापरावी लागत आहे. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना धडा शिकवणार की नाही, असा प्रश्नही मोदींनी उपस्थितांना विचारला.

तसेच, चुन चुनके साफ कर दो, इस बार इन्हे मैदान मे मत रहने दो, म्हणजेच विरोधकांना शोधून शोधून साफ करा. त्यांना निवडणुकीच्या रिंगणात राहूच देऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेसचे लोक अजूनही आणीबाणीच्या मनोवृत्तीत आहेत. त्यांना लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळेच जनमताच्या विरोधात ते जनतेला चिथावणी देण्याचे काम करत आहेत, असा हल्लाबोलही पंतप्रधान मोदी यांनी केला.

- Advertisement -

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला दोन गट दिसतील. एका बाजूला आमचा गट प्रामाणिकता आणि पारदर्शकता घेऊन लोकांसमोर येत आहे. तर दुसऱ्या बाजूला भ्रष्ट आणि घराणेशाही असलेला गट आहे. हे भ्रष्ट लोक मोदीला धमकावण्याचे आणि शिवीगाळ करण्याचे काम करतात. त्यामुळे आम्ही म्हणतो भ्रष्टाचार हटवा. पण ते म्हणतात, भ्रष्टाचार वाचवा, असा टोलाही मोदींनी लगावला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

रविवारी (ता. 31 मार्च) दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले होते की, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत फिक्सिंग केलेले आहे. ईव्हीएममध्ये घोळ घालणे, सोशल मीडिया आणि माध्यमांवर दबाव टाकणे हे उपाय योजल्याशिवाय भाजपा 180 पेक्षा अधिक जागी जिंकूच शकत नाही. जर देशात तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता आली आणि त्यांनी संविधानाला बदलण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देशात आगडोंब पसरेल. माझे शब्द लिहून ठेवा. हा देश वाचणार नाही.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : भाजपा कोणत्या तोंडाने ही बाब नाकारणार? रोहित पवारांचा थेट सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -