National Start-up Day: देशात दरवर्षी १६ जानेवारीला साजरा केला जाणार ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’

इनोव्हेशनसाठी भारतात जी मोहीम सुरू आहे, त्याच्या प्रभाव ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (Global Innovation Index) मध्ये पडला असून भारताच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi says Jan 16 to be celebrated as National Start-up Day
National Start-up Day: देशात दरवर्षी १६ जानेवारीला साजरा केला जाणार 'नॅशनल स्टार्ट-अप डे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप उद्योगजकांसोबत (PM Modi Interaction with Start-ups) आज सकाळी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशात दरवर्षी १६ जानेवारीला ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’ (National Start-up Day) साजरा केला जाईल अशी घोषणा केली. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशातील त्या सर्व स्टार्टअप्सना, सर्व इनोव्हेटिव्ह तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो, जे स्टार्टअप्सच्या जगात भारताचा झेंडा उंच फटकवत आहेत. स्टार्टअप्सची ही संस्कृती देशात बराच काळापर्यंत राहिल. यासाठी १६ जानेवारी दिवस आता नॅशनल स्टार्ट-अप डेटच्या रुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.’

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आमचा प्रयत्न देशात लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेचे आकर्षण निर्माण करणे आणि इनोव्हेशनला संस्थात्मक रुप देणे आहे. ९ हजारहून अधिक अटल टिंकरिंग लॅब्स आज मुलांना शाळेत इनोव्हेटेड करणे आणि नवीन विचारावर काम करण्याची संधी देत आहेत.’

‘सरकार वेगवेगळ्या विभाग, मंत्रालय, तरुणांना आणि स्टार्ट-अप्ससोबत संपर्कात आहे. त्याच्या कल्पनांना प्रोत्साहन देतात. सरकारचे प्राधान्य जास्तीत जास्त तरुणांना इनोव्हेशनसाठी संधी देणे आहे. इनोव्हेशनसाठी भारतात जी मोहीम सुरू आहे, त्याच्या प्रभाव ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (Global Innovation Index) मध्ये पडला असून भारताच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे. २०१५ साली या क्रमवारीत भारत ८१ नंबरवर होता, आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ४६व्या नंबरवर आहे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


हेही वाचा – दर १० पैकी ६ फ्रंटलाइन वर्कर्सना नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्यास काम गमावण्याची भीती – अहवाल