घरताज्या घडामोडीकर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; तरुण थेट पोहोचला ताफ्याजवळ

कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; तरुण थेट पोहोचला ताफ्याजवळ

Subscribe

कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदी हुबळीमध्ये रोड शो करत होते. यादरम्यान एक तरुण पीएम मोदींच्या सुरक्षेचे कवच म्हणजेच SPG सुरक्षा भेदून गाडीजवळ पोहोचला.

कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदी हुबळीमध्ये रोड शो करत होते. यादरम्यान एक तरुण पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचे कवच म्हणजेच SPG सुरक्षा भेदून गाडीजवळ पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (PM Narendra Modi Security Breach Roadshow In Hubballi Karnataka Video Poice Denied Claim)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटनासाठी कर्नाटकात आले आहेत. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदींनी रोड शो घेतला. मोदींच्या रोड शोदरम्यान एक व्यक्ती अचानक त्याच्या वाहनाजवळ पोहोचला. त्या व्यक्तीला पंतप्रधान मोदींना पुष्पहार घालायचा होता. मात्र, तो माणूस पंतप्रधानांच्या दिशेने येत असल्याचे पहिल्यावर सुरक्षारक्षकांनी तात्काळ त्याला मध्येच थांबवले. त्यांना तातडीने पंतप्रधानांच्या ताफ्यातून दूर नेण्यात आले.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये फुलांचा हार घेऊन एक तरूण मोदींजवळ पोहचल्याचे दिसत आहे. SPG सुरक्षा भेदून हा व्यक्ती पंतप्रधान मोदींजवळ पोहचला. त्यावेळी SPG जवानांनी तात्काळ तरूणाला पकडून दूर केल्याचे दिसते.

दरम्यान, गतवर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. पंतप्रधान मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान सुरक्षेसंदर्भात त्रुटी आढळल्या होत्या. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदी हे पंजाबमधल्या हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी भटिंडा इथे पोहचले. त्यावेळी तेथून मोदी हे स्मारकाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने न जाता रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. हा रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता.

- Advertisement -

डीजीपी पंजाब पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाककडे निघाला. प्रवासादरम्यान एका फ्लायओव्हरवर काही आंदोलकांनी रस्ता अडवला. यामुळे या आंदोलकांमुळे मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावरच अडकला. या कालावधीत सुमारे 15-20 मिनिट नरेंद्र मोदी आपल्या वाहनात बसून राहावे लागले होते.


हेही वाचा – पदवीधर निवडणूक : उमेदवार बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; नाना पटोलेंचे वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -