घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींनी, केजरीवाल यांना फटकारले

पंतप्रधान मोदींनी, केजरीवाल यांना फटकारले

Subscribe

पंतप्रधानांनी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे लाईव्ह प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चांगलेच फटकारले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी मोदींकडे राजधानीत ऑक्सिजचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत मदत मागितली. तसेच अनेक पर्यायही सुचवले. मात्र, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने वाद निर्माण झाला.

कोरोनासंबंधी राष्ट्रीय योजना असेल तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे त्यादृष्टीने काम करतील, असे अरविंद केजरीवाल सांगत होते. अरविंद केजरीवाल आपले म्हणणे मांडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रोखले आणि फटकारले.

- Advertisement -

मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री अशा अंतर्गत बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करणे आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला नेहमी याचे पालन केले पाहिजे. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी खेद व्यक्त करत पुढच्या वेळी हे लक्षात ठेवू, असे सांगितले. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपले म्हणणे पूर्ण करत आपण काही चुकीचे केले असेल तर माफ करावे सांगत माफी मागितली. यावेळी त्यांनी मोदींना आपण दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल, असे आश्वासन दिले.

दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा
मुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधी खुलासा केला असून केंद्र सरकारने चर्चेचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती, असे सांगितले आहे. या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -