घरदेश-विदेशPM Narendra Modi : बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला? मोदींचा...

PM Narendra Modi : बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला? मोदींचा काँग्रेसला सवाल

Subscribe

सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्या आंध्रप्रदेशसोबत काय केले? आंध्रप्रदेशते विभाजन केलं. विभाजन करताना माईक बंद केले. चर्चा केल्या नाही. ही लोकशाही होती का? ही पद्धत योग्य होती का? असा प्रश्नांच्या फेऱ्यात मोदींनी काँग्रेसला अडकवण्याचा प्रयत्न केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे. काल लोकसभेत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा राज्यसभेतही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस नसती तर देशाची अवस्था कशी असता याचा पाठा वाचत मोदींनी काँग्रेस पक्षाने कोणत्या पक्षांना दिला याची यादीच सांगितली. अविश्वास, अस्थिर, बरखास्त करा ही काँग्रेसची नीती राहिल्याचा आरोप करत त्यांनी सत्ता असताना त्या काळच्या राज्य सरकारला त्रास दिल्याची टीका केली आहे. तसेच काँग्रेसने स्वपक्षीयांनाही सोडलं नाही, त्यांनाही नीतीनुसार त्रास दिला असा घणाघाती हल्ला पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. तसेच महाराष्ट्रातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला? असा सवाल उपस्थित करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत घेरण्याचा प्रयत्न केला.

लोकशाहीच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेस पक्षाला धारेवर धरले. काँग्रेसचे हायकमांड तीन नीतींवर चालते. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरं डीस्टॅबलाईज्ड आणि तिसरी म्हणजे डिसमिस. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा या नीतींवर काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिल्याची टीका मोदींनी केली आहे.

- Advertisement -

सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्या आंध्रप्रदेशसोबत काय केले? आंध्रप्रदेशते विभाजन केलं. विभाजन करताना माईक बंद केले. चर्चा केल्या नाही. ही लोकशाही होती का? ही पद्धत योग्य होती का? असा प्रश्नांच्या फेऱ्यात मोदींनी काँग्रेसला अडकवण्याचा प्रयत्न केला.

फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं? आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? असे अनेक प्रश्न मोदींनी उपस्थित केले आहे.


Parliament Session : ‘काँग्रेसने देशाची दुर्दशा केली’, पंतप्रधान मोदींची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -