घरदेश-विदेशकलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर मोदी बरसले

कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर मोदी बरसले

Subscribe

अकोला येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० वरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना 'डुब मरो' असे म्हटले आहे.

राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. सत्ताधारी भाजप पक्षाकडून प्रचारसभांमधून काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या कायद्यावरुन प्रचार सुरु आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका होत आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केले त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. याच प्रश्नाला प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ‘३७० चा महाराष्ट्राशी संबंध काय? असा प्रश्न विचारणाऱ्यांनो, डुब मरो’, अशा शब्दात मोदींनी विरोधकांना उत्तर दिले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात तीन सभा होत्या. यापैकी दोन सभा अकोला आणि जालना इथे झाल्या. त्यानंतर तिसरी सभा ही संध्याकाळी नवी मुंबईतील खारघर येथे होणार आहे. दरम्यान, अकोला येथील सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी कलम ३७० वरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना ‘डुब मरो’ असे म्हटले आहे.

…असे म्हणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे – मोदी

‘कलम ३७० चा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, असे म्हणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अशा लोकांनी कान उघडे ठेवून ऐका, जम्मू-काश्मीर येथील जनता ही भारत मातेची लेकरे आहेत. आज संपूर्ण देश भारत मातेचीच लेकरे आहेत. संपूर्ण देश एक होऊन काश्मीरच्या मागे उभा आहे. देशाच्या संरक्षणासाठी शिवरांयांच्या भुमितील मावळे हौतात्म पत्करत आहे आणि तुम्ही कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबंध म्हणून प्रश्न विचारत आहात’, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली; उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -