घरताज्या घडामोडीपुढच्या काही आठवड्यात कोरोनावरील लस मिळणार - मोदी

पुढच्या काही आठवड्यात कोरोनावरील लस मिळणार – मोदी

Subscribe

देशात कोरोनाच्या आठ लसींवर काम चालू आहे. त्यातील तीन लसी भारतीय असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी कोरोनावरील लसीविषयी माहिती दिली. पुढच्या काही दिवसांत देशात कोरोना लस देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. मोदींनी काही दिवसांपूर्वीच देशातील तीन शहरात कोरोना लसींच्या निर्मिती कंपनींची भेट घेतली. लस कधी मिळणार आणि सर्वात प्रथम ती कोणाला देणार याबद्दलही मोदींनी सविस्तर माहिती दिली. देशात कोरोनाच्या आठ लसींवर काम चालू आहे. त्यातील तीन लसी भारतीय असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

कोरोना लसीच्या संदर्भात वैज्ञानिकांनी हिराव कंदील दिल्यास देशात कोरोनालसीकरणाला सुरूवात होईल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. पुढच्या काही आठवड्यात कोरोनाची लस उपलब्ध होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होते तेव्हा अनेक अफवा उठतात. या अफवा जनहीत आणि देशहीताच्या विरोधात असतात. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की लोकांना या लसींबद्दस जागृक करा. सामान्य लोक कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्या, असेही मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी झालेल्या चर्चेमधून अनेक महत्त्वाचे सल्ले मिळाल्याचेही मोदींनी सांगितले. कोरोनाच्या लसीसाठी जास्त काळ वाट पहावी लागणार नाही असे महत्त्वाची माहिती मोदींनी दिली. कोरोनाची लस आल्यावर सर्वात आधी आजारी आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर फ्रन्ट लाईनवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे असे मोदींनी स्पष्ट केले आहे. सर्व राजकीय पक्ष आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणात सहकार्य करावे असे मोदींनी सांगितले आहे.


हेही वाचा – मोदींची नक्की भूमिका काय? राहुल गांधींचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -