‘वो अब चल चुके है…’, शायरीतून मोदींचा काँग्रेसला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात एक शायरी म्हटली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात एक शायरी म्हटली. या शायरीच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसवर टीका केली. (PM Narendra Modi Speech criticized Congress leader Rahul Gandhi)

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काही टीका करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका मोठ्या नेत्याने त्यांचा अपमान केला, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. अशा लोकांना म्हटलं जातं की ‘यह कह कह कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वह अब आ रहे है,’ असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.

मी काल राष्ट्रपतींचे अभिभाषण पाहत होतो. काहींच्या भाषणावेळी समर्थक उड्या मारत होते. खूप आनंदी होते. ‘ये हुई ना बात’ म्हणून शाबासकीही दिली. काल त्यांना चांगली झोप लागली असावी आणि त्यामुळे कदाचित आज ते उठू शकले नाही, अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली.

नरेंद्र मोदींच्या भाषणाची सुरुवात जय श्री राम या घोषणांनी झाली. पंतप्रधान मोदींनी आपल्या अभिभाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर कोणाचाही आक्षेप नसल्याचेही नरेंद्र मोदींनी सांगितले. “राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा गौरव वाढवला. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी समाजाचा गौरव वाढत आहे, आत्मविश्वास वाढत आहे. त्यामुळे हे सभागृह आणि संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. प्रजासत्ताकाचे प्रमुख म्हणून त्यांची उपस्थितीत ऐतिहासिकही आहे. देशाच्या कोट्यवधी बहिणी-मुलींसाठी प्रेरणाही आहेत”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा – काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते; पंतप्रधानांचा राहुल गांधींना टोला