घरदेश-विदेशविरोधकांकडे चिखल, माझ्याकडे गुलाल; PM मोदींची काव्यात्मक टोलेबाजी

विरोधकांकडे चिखल, माझ्याकडे गुलाल; PM मोदींची काव्यात्मक टोलेबाजी

Subscribe

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत आभार व्यक्त केले. यावेळी मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.

विरोधकांकडे चिखल होता, माझ्याकडे गुलाल होता, जे ज्यांच्याकडे जे होते, ते त्यांनी उडवले. जितका चिखल उडवला जाईल, तितकं कमळ फुलत जाईल, तुम्ही लोकांनी कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत विरोधकांवर काव्यात्मक टोलेबाजी केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी विरोधकांवर चांगलेच बरसले आहेत. यात मुख्यत: काँग्रेसवरही सडकून टीका केली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत आभार व्यक्त केले. यावेळी मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यावर मोदींनी निराशा व्यक्त केली. मोदी म्हणाले की, सभागृहातील काही लोकांचे वागणे दुर्दैवी आहे. हे वागणं केवळ सभागृहाचीच नव्हे तर देशाचीही निराशा करणार आहे.

- Advertisement -

यानंतरही विरोधकांनी ‘मोदी-अदानी भाई-भाई’च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडत, जेपीसीची मागणी केली. यावर राज्यसभेच्या अध्यक्षांनी विरोधकांना शांत होण्याचं आवाहन केलं, पण विरोधकांनी त्यांना दाद दिली नाही.

विरोधकांच्या गदारोळातही मोदींनी आपलं भाषण सुरु ठेवलं काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले की, 60 वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच केले. त्यांचा हेतू नसावा, पण त्यांनी ते केले. खड्डा खोदत असताना त्यांनी 6 दशकं वाया घालवली. त्यावेळी जगातील छोटे छोटे देशही यशाच्या शिखरांना गवसणी घालत होते.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसने बँकांचे एकत्रीकरण गरिबांना बँकांचे हक्क मिळावेत या उद्देशाने केले होते, परंतु देशातील निम्म्याहून अधिक लोकांना बँकेच्या दारापर्यंतही पोहोचता आलं नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही जन-धन बँक खाती उघडली. या माध्यमातून देशाच्या खेड्यापाड्यात प्रगतीपथावर नेण्याचे काम केले, असं म्हणत त्यांनी भाजप सरकारचं कौतुक केलं.

काँग्रेसवर हल्लाबोल करत मोदी म्हणाले की, देशातील जनता आता काँग्रेसचं खातं बंद करत आहे. पूर्वी प्रकल्प लटकायचे, अडकायचे, भटकायचे.. आज आठवडाभरात आराखडा तयार होतो. गेल्या 3-4 वर्षात सुमारे 11 कोटी घरांना नळाचे कनेक्शन देण्यात आले आहे. आम्ही जन धन खाते चळवळ सुरू केली. गेल्या 9 वर्षात देशभरात 48 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.

काँग्रेसने कोणत्याही आव्हांनाला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण आम्ही आव्हान पाहून पळून जाणारे लोकं नाहीत, अशा शब्दात मोदींना काँग्रेस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.


आंध्र प्रदेशात तेलाचे टँकर साफ करताना सात मजुरांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -