‘स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून….’ भाषणात मोदींचे मोठे विधान

स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली आहे'', असे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

“स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली आहे”, असे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर देशवासीयांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी हे विधान केले. (pm narendra modi speech on 75 independence day har ghar tiranga)

“दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशवासीयांचा गौरव करण्याची संधी मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे. मी देशाचा पंतप्रधान म्हणून बोलत आहे. मी या देशातील जनतेचे दु:ख जाणतो. मी जितके तुमच्याकडून शिकलोय, तितकेच मी तुम्हाला ओळखतो. तुमच्या सुख-दु:खाशी मी परिचीत आहे. ते दु:ख दूर करण्यासाठी मी कायम प्रयत्नसील करेन. त्यासाठी मी संपूर्ण वेळ द्यायला तयार आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन म्हटले.

याशिवाय, “भारत लोकशाहीची जननी आहे. शेवटच्या माणसाला फायदा व्हावा, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं. मी माझे महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं आहे”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी ध्वज फडकविला जात आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यत आले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील लाहोरी गेटच्या वर भारतीय राष्ट्रध्वज उंचावला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.

भाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.


हेही वाचा – दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन