Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशPM Modi : मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो, साहित्य संमेलनात मोदींचे वक्तव्य

PM Modi : मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो, साहित्य संमेलनात मोदींचे वक्तव्य

Subscribe

तब्बल सात दशकांनंतर नवी दिल्ली होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. तब्बल सात दशकांनंतर नवी दिल्ली होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. मराठी साहित्य संमेलन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. (PM Narendra Modi statement at the 98th All India Marathi Literature Conference is in the news)

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. त्यामुळे दिल्लीत साहित संमनेलासाठी तुम्ही अतिशय चांगला दिवस निवडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असताना हे मराठी संमेलन होत आहे. मित्राने मी जेव्हा मराठीचा विचार करतो, तेव्हा मला संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवतात. मराठी भाषा अमृताहुनी गोड आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत असलेल्या माझ्या प्रेमाविषयी तुम्ही जाणता. मी मराठी भाषेतील अनेक शब्द शिकण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्राच्या भूमीवरील एका महापुरुषाने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना केली होती. संघ गेल्या 100 वर्षांपासून काम करतो आहे. संघामुळे माझ्यासारखे लाखो लोकांना देशासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे मोदी म्हणाले.

हेही वााच – Chhaava : मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांकडून छावाचा उल्लेख, उपस्थितांनी दिल्या घोषणा

नरेंद्र मोदी म्हणाले की, संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देश आणि जगात 12 कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.