घरताज्या घडामोडीMSP आहे आणि राहणार, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं - पंतप्रधान मोदी

MSP आहे आणि राहणार, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं – पंतप्रधान मोदी

Subscribe

आंदोलनजीवींपासून सावध राहिलं पाहिजे, मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवर भाष्य करताना शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. मी चर्चेसाठी तयार आहे पण हे आंदोलन थांबवा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. MSP होती, MSP आहे आणि MSP राहणार, असं आश्वासन देखील मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. मोदी यांनी आवाहन करताना आपल्याला पुढं जावं लागेल. शिव्या मला द्या पण कृषी क्षेत्रात सुधारणा व्हायला द्या असं मोदी म्हणाले. आंदोलनात वृद्ध देखील सामिल झाले आहेत. त्यांनी घरी जायला हवं, असं मोदी म्हणाले.

एकत्र बसून चर्चा करु आणि कृषी कायद्यांवर तोडगा काढू, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे. आंदोलनात वृद्ध देखील सामिल झाले आहेत. त्यांनी घरी जायला हवं. आंदोलन संपवा आणि चर्चा सुरु ठेवा. शेतकऱ्यांसोबत सातत्याने चर्चा केली जात आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळई शेतकऱअयांनी MSP चं आश्वासन देखील दिलं. MSP होती, MSP आहे आणि MSP राहणार. कृषी समित्यांना बळकटी दिली जात आहे. ज्या ८० कोटी लोकांना रेशन दिलं जात आहे ते सुरुच राहणार आहे. जर आपण आता उशिर केला तर आम्ही शेतकऱ्यांना अंधाराकडे ढकलू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री जी यांना जेव्हा कृषी सुधारणा कराव्या लागल्या तेव्हा त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यावेळी डावे लोक कॉंग्रेसला अमेरिकेचा एजंट म्हणत असत, आज ते मला शिव्या घालत आहेत, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

आंदोलनजीवींपासून सावध राहिलं पाहिजे – मोदी

देशात नवा समुदाय तयार झाला आहे तो म्हणजे आंदोलनजीवी. काही बुद्धीवादी आहेत, परंतु काही लोक आंदोलनजीवी बनले आहेत. देशात कुठेही आंदोलन झाल्यास ही जमात तिथे जाते. कधी पडद्यामागे तर कधी आघाडीवर अशा लोकांना ओळखून आपण सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत, परंतु जर कुणाचं आंदोलन चालू असेल तर ते तिथे पोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, जे सर्वत्र आढळतात, यांच्यापासून देशाला वाचवलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा – कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यू-टर्न घेतला; मोदींचा पवारांवर निशाणा

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -