घरCORONA UPDATE...म्हणून पंतप्रधानांनी ठरवली १० ची वेळ

…म्हणून पंतप्रधानांनी ठरवली १० ची वेळ

Subscribe

देशाचे लॉकडाऊन उद्या संपणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. मात्र, त्यांनी १० ची वेळ दिल्याने सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.

देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी केली. दरम्यान, उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मंगळवारी सकाळी १० वाजता संबोधित करणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांचे लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी यावर पंतप्रधान कोणता निर्णय घेणार हे उद्या कळणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सकाळी ९ वाजता रामायण लागते, त्यामुळेच पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्यासाठी १० ची वेळ निवडल्याचे बोले जात आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी कोरोनाबाबत संबोधित केले तेव्हा ९ ची वेळ दिली होती. १० मिनिटे त्यांनी लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले होते. त्यामुळे दूरदर्शन वृत्तवाहिनीने रामायण १० मिनिटे उशीरा दाखवले होते. दरम्यान, यावेळी रामायण वेळेत लागावे किंवा ते प्रेक्षकांसाठी चुकू नये, याकरता पंतप्रधानांनी १० ची वेळ ठेवली का? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात २१ दिवस काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण मालिकांचे शूटिंग देखील रद्द करण्यात आले होते. त्यामुळे यावेळी लोकांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने घरी बसून दूरदर्शनवरील अनेकांची मने जिंकलेली ‘रामायण’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

काय सांगणार उद्या पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घंटानाद, थाळीनाद करण्यास सांगितले होते. त्यानंतर रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाईट बंद करुन दिवे आणि मेणबत्ती लावण्याचे सांगितले. लोकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र, आता उद्या पंतप्रधान काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – ऑनलाईन मागवलेले खाद्य ‘असे’ करा कोरोनामुक्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -