Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणारी परिचारिका म्हणाली, 'माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस'

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणारी परिचारिका म्हणाली, ‘माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस’

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी त्यांनी १ मार्चला कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पहिला डोस घेतला होता. त्यामुळे आज त्यांनी दुसरा डोस घेऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन नर्सेसने कोरोनाचे डोस दिले. एक पुद्दुचेरीची पी निवेदा तर दुसऱ्या पंजाबची निशा शर्मा असे या दोन नर्सेसचे नाव आहे.

पंतप्रधान मोदी यांना दुसरा डोस दिल्यानंतर नर्स निशा शर्मा म्हणाली की, ‘मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला. ते आमच्यासोबत बोलले. त्यांना भेटणे आणि त्यांना लस देणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल.’

- Advertisement -

तर १ मार्चला पहिला डोस देणारी नर्स निवेदा म्हणाली की, ‘मी नरेंद्र मोदी यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला होता. आज लसीचा दुसरा डोस देण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यासोबत भेट झाली. ते आमच्याशी बोलले, आम्ही त्यांच्या फोटो काढले.’

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मी आज एम्स (AIIMS) रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठीच्या पर्यायांमधील लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही कोरोना लस घेण्यास पात्र असाल तर cowin.gov.in या वेबसाईटवर आपले नाव नोंदवा आणि कोरोना लसीचा डोस घ्या.’


हेही वाचा – Coronavirus Maharashtra: चिंताजनक! कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानावर!


 

- Advertisement -