घरताज्या घडामोडी7th International Yoga Day: उद्या सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला...

7th International Yoga Day: उद्या सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ७ वा योग दिनानिमित्ताने उद्या, सोमवारी सकाळी ६.३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन एक टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या स्वरुपात केला जाईल. हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सर्व चॅनलवर सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नोडल एजन्सी आयुष मंत्रालयाच्या मते, या वर्षाची योग दिनाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ आहे. जी शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग्य अभ्यासावर केंद्रीत आहे.

योग प्रदर्शनानंतर सकाळी ७.०० ते ७.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. कार्यक्रमात आयुष राज्यमंत्री किरण रिजिजू देखील संबोधित करू शकतील. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाद्वारे योग सजीव प्रदर्शन सामील होतील. माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय योग दिन जगातील जवळपास १९० देश साजरा करणार आहेत. योग दिनानिमित्ताने होणाऱ्या विविध ठिकाणच्या कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी फक्त २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग असेल.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि इतर मान्यवारांच्या भाषणानंतर सकाळी योगा केला जाईल. कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्हर्च्युअल पद्धतीने योग कार्यक्रम साजरा होणार आहे. मग यानंतर अध्यात्मिक आणि योग गुरू लोकांना संबोधित करणार आहेत. यामध्ये श्रीश्री रविशंकर, सद्गुरु जग्गी वासुदेव, डॉ. एचआर नगेंद्र, कमलेश पटेल, स्वामी भारत भूषण, डॉ. विश्वास मंडालिक, सिस्टर बीके शिवानी, एस. श्रीधरन, डॉ. वीरेंद्र हेगड़े, डॉ. हमसाजी जयदेव, ओपी तिवारी, स्वामी चिदानंद सरस्वती, डॉ. चिन्मय पांडेय, मुनि श्री सागर महाराज आणि ए. रोजी हे सहभागी होतील.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -